शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

10th - 12th Supplementary Exam: दहावी, बारावी पुरवणी परीक्षा (उद्या) १६ जुलै पासून सुरू

By प्रशांत बिडवे | Updated: July 15, 2024 17:22 IST

यंदा दहावीला २८ हजार ९७६ आणि बारावी पुरवणी परीक्षेसाठी एकुण ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे

पुणे: राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेला मंगळवार दि. १६ जुलै पासून सुरूवात हाेणार आहे. दहावीची परीक्षा येत्या ३० जुलै तर बारावीची परीक्षा दि. ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. यंदा दहावीला २८ हजार ९७६ आणि बारावी पुरवणी परीक्षेसाठी एकुण ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट- २०२४ मध्ये पुरवणी परीक्षेचे आयाेजन केले आहे. सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता व दुपार सत्रात अडीच वाजता परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे गरजेचे आहे. सकाळ सत्रात अकरा आणि दुपार सत्रात दुपारी तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी राज्य मंडळामार्फत प्रसिद्ध तसेच छपाई वेळापत्रकच ग्राह्य धरावे असे आवाहन मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.           फेब्रुवारी- मार्च २०२४ परीक्षेप्रमाणेच जुलै-ऑगस्ट २०२४ पुरवणी परीक्षेमध्ये पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेली आहे. जुलै-ऑगस्ट २०२४ च्या पुरवणी परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन व श्रेणी आदी परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरून घेण्यात येणार आहेत. याबाबतची लिंक व सविस्तर सूचना विभागीय मंडळांमार्फत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेल्या आहेत.

पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थी नोंदणी

इयत्ता १० वी / इयत्ता १२ वी

मुले : २०३७० / ३६५९०मुली : ८६०५ / २०२५०तृतीयपंथी : ०१ / ०५एकुण : २८९७६ / ५६८४५

टॅग्स :Puneपुणेssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थी