आनंदनगर येथे १०५ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:08 IST2021-07-18T04:08:22+5:302021-07-18T04:08:22+5:30

धायरी : स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकमत माध्यम समूह ...

105 people donated blood at Anandnagar | आनंदनगर येथे १०५ जणांनी केले रक्तदान

आनंदनगर येथे १०५ जणांनी केले रक्तदान

धायरी : स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकमत माध्यम समूह व नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी १०५ जणांनी रक्तदान केले.

सिंहगड रस्ता परिसरातील आनंदनगर येथील स्व. रमेशभाऊ वांजळे जलतरण केंद्रात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिराचे आयोजन नगरसेवक प्रसन्न जगताप मित्र-परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मार्केट यार्ड येथील व्यापारी मंगल भाटिया यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड, शेखर यादव, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद जगताप व केतन घोडके उपस्थित होते. किशोर कुलकर्णी, रमेश दौंडकर, सचिन देशमुख, राहुल जोशी, रवींद्र चौधरी, अविनाश खंडारे, सोमशेखर कमतगी, नयन जोशी, गणेश चौधरी, अभिषेक गुजराथी, आकाश कडू, अजय भानुसे, भाऊसाहेब निकम, राजाभाऊ कदम, शेखर वाघ, तानाजी पासलकर, कुणाल मते-पाटील, मिलिंद पुणेकर यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

१७ धायरी रक्तदान

नगरसेवक प्रसन्न जगताप मित्र-परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सहभागी झालेले रक्तदाते.

Web Title: 105 people donated blood at Anandnagar