१०४ वर्षांच्या आजोबांची कोरोनामुक्तीसाठी ‘अल्ला’कडे प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:23+5:302021-05-15T04:10:23+5:30
कोट आमच्या आजोबांनी कधीही रोजा चुकवले नाही. ह्या वर्षी आम्ही त्यांना सांगितले होते की रोजा करू नका, पण त्यांचा ...

१०४ वर्षांच्या आजोबांची कोरोनामुक्तीसाठी ‘अल्ला’कडे प्रार्थना
कोट
आमच्या आजोबांनी कधीही रोजा चुकवले नाही. ह्या वर्षी आम्ही त्यांना सांगितले होते की रोजा करू नका, पण त्यांचा हट्ट होता की माझ्या देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे मला हा रोजा करायचा आहे माझ्या तब्येतीची काळजी करू नका असेही त्यांनी नमूद केले आहे.
-तन्वीर नासीर जोड, नातू
हाजी इब्राहिम जोड हे मूळचे राजस्थानचे, १९५० साली ते येरवडया मध्ये आले. सुरुवातीच्या काळात काही वर्ष त्यांनी ब्रिटिश आर्मीत देखील काम केले. बांधकामामध्ये कलाकुसरीचे काम करण्याचा त्यांचा मूळ व्यवसाय होता. राजस्थानमधून येरवडा व पुणे शहरात अनेक कुटुंबांना त्यांनी स्थायिक केले. पुढे जाऊन बांधकाम व्यवसायात जोड कुटुंबाने पाऊल टाकले. आज समाजात एक प्रतिष्ठित कुटुंब म्हणून जोड परिवार ओळखले जाते. संजयपार्क, येरवडा, विमाननगर, टिंगरेनगर या परिसरात जोड कुटुंबीय वास्तव्यास आहेत. वयाच्या शंभरी पूर्ण केल्यानंतर देखील ते स्वतःचे सर्व काम स्वतःच करतात. त्यांचा थोरला मुलगा ८१ वर्षाचा तर धाकटा मुलगा ५२ वर्षाचा आहे. झाडांना पाणी घालण्याचा त्यांना छंद आहे.
पवित्र रमजान महिन्यात त्यांनी नेहमी प्रमाणेच उपास केले आहेत. मात्र यंदा कोरोना महामारी च्या संकटाला संपविण्यासाठी त्यांनी अल्लाहाकडे विशेष प्रार्थना केली. हाजी जोड यांना अद्याप कोणत्याही प्रकारचा आजार नाही. माणसाने माणसाशी माणसा सारखे वागणे, समाजातील दुःख कमी करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे. अशी देवाची प्रामाणिक शिकवण असून सर्वांनी त्याचा अवलंब करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
फोटो ओळ - जगावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे, अशी विशेष प्रार्थना रमजान ईद निमित्त एकशे चार वर्षाच्या हाजी इब्राहीम जोड यांनी केली.