शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावी शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेसाठी १० हजार ८४१ अर्ज

By राजू हिंगे | Updated: January 7, 2024 14:37 IST

अर्जाची तपासणी करण्यास सुरवात झाली असुन येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील

पुणे: पुणे महापालिका  हद्दीत राहणाऱ्या १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत  आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेसाठी १० हजार ८४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जाची तपासणी करण्यास सुरवात झाली असुन येत्या  काही दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.   पुणे महापालिकेने या योजनेसाठी  पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले होते.  अर्ज करण्याचा कालावधी २९ डिसेंबर रोजी संपला आहे या कालावधीत पालिकेकडे १०,८४१  अर्ज प्राप्त झाले आहेत. या शिष्यवृत्तीसाठी  ऑनलाईन अर्ज समाज विकास विभागाकडे  प्राप्त झाले आहेत. मात्र अनेक अर्जदार हे दिलेल्या अटी व शर्तीनुसार कागदपत्राची पूर्तता करीत नाही. तसेच अर्ज हा सेव्ह ॲज डाफ्र्ट मध्ये ठेवत होते.  त्यामुळे महापालिका समाज विकास विभागाने सूचना केली होती कि, अर्जदाराने भरलेला अर्ज हा सेव्ह ॲज ड्राफ्ट मध्ये तसाच ठेवला असेल तर कागदपत्राची पूर्तता त्वरित करून अर्ज भरावा. तसे न केल्यास सदरचा अर्ज रद्द बातल ठरविण्यात येणार आहे. यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित अर्जदारावर राहील.  तरीही २हजार ६६९ अर्ज रद्द झाले आहेत. यात संबंधित अर्जदाराचीच चूक आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्थसंकल्पात 21 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उमेदवारांचे अर्ज आल्यानंतर तात्काळ तपासण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यांनतर तात्काळ विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल. महिना अखेर पर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना  या योजनेचे पैसे दिले जातील. लोकसभा आचारसंहिता लागू होण्या अगोदर ही प्रक्रिया प्रशासनाला पूर्ण करावी लागणार आहे असे पालिका प्रशासनाने सांगितले.

 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाEducationशिक्षण