शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आरोग्य विभागाला 10 कोटींचा 'बूस्टर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 12:35 IST

अर्थसंकल्पात कोरोना लाटेची शक्यता गृहीत धरून महापालिकेने जाहीर केला मास्टर प्लॅन...

पुणे : कोरोनाच्या वाढती रुग्णसंख्या व दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून महापालिकेने अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केली आहे. कोरोना संकटाशी लढा देताना शहरातील आरोग्य विभागाला तब्बल 10 कोटींचा बूस्टर डोस दिला आहे. तसेच सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने काही महत्वाची पावले उचलली आहे. पण कोरोनासारख्या संकटाशी लढताना ही आर्थिक तरतूद पुरेशी आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आरोग्य विषयक सुधारणांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले कोरोनामुळे उत्पन्न घटलेले असतानाही स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सन 2021-22 चे तब्बल 8 हजार 370 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल, मनसेचे गटनेते वसंत मोरे, आरपीआयच्या गटनेत्या सुनिता वाडेकर, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद जाहीर केली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याकडे देखील भर देण्यात आला आहे.

आवश्यकता भासल्यास अधिक रक्कम खर्च करणार..

कोरोना साठीच्या पायाभूत सुविधा आत्ता उपलब्ध आहेत. जर पुन्हा आवश्यकता भासली तर त्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. यासाठी जर वेळ पडली तर आवश्यकता भासेल तशी रक्कम खर्च करण्यात येईल...

हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती.

...............

शहरातील कोरोना काळातील तपशील (दि. २४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत

कोविड केअर सेंटर३०उपलब्ध बेड्स१०,५००डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर/हॉस्पिटलमधील बेड७,४६६आयसीयू बेड१,०५५व्हेंटिलेटरचे बेड५२१एकूण उपलब्ध बेड१८,०००सर्वेक्षण केलेली कुटुंबे१३,२१,६२८गंभीर आजार, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला सर्वेक्षण४,०२,३४३कोविड सेंटर आणि स्वॅब सेंटर१७रुग्णवाहिका३०‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ तपासणी३२,०५,५३७कोविड १९ प्रादुर्भाव१,९९,६९६बरे झालेले रुग्ण१,९१,३००मृत४,८३७

पूर्वतयारी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी लढण्याची पूर्वतयारी

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी लढण्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे. या तयारीचा तपशील पुढीलप्रमाणे

तपशील संख्याएका दिवशी संभाव्य कमाल रुग्ण१९,५६० होम आयसोलेशन७,८२४ कोविड केअर सेंटरमध्ये८,८०२ बेड्स (उपलब्ध १० हजार)ऑक्सिजन बेड्स२९३४ (उपलब्ध ५,०५०)

साधे ऑक्सिजन आवश्यक बेड्स२,३४७ (उपलब्ध ३,९९५)

आयसीयू आवश्यक५८७ बेड्स (उपलब्ध १०५५) 

आयसीयू आणि व्हेंटिलेटर आवश्यक बेड्स२९४ (उपलब्ध ५३४) आयसीयू नसलेले व्हेंटिलेटर आवश्यक२९३ (उपलब्ध ५२१) 

स्वॅब सेंटर१८

प्रयोगशाळा१९ (३ शासकीय आणि १६ खाजगी) नमुना तपासणी क्षमता दररोज३,११५ 

कोविड सेंटर३०

तसेच उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री, औषधे आणि पुरेसे मनुष्यबळ यांची तयारी ठेवण्यात आलेली आहे. 

...........

नवीन कार्डिअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्स

हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णांना ऑक्सिजनसह विशिष्ट प्रकारच्या विशेष उपचारांची गरज असते. त्यासाठी पुणे महापालिकेने दोन कार्डिअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्स नुकत्याच खरेदी केल्या आहेत. रुग्णालयांची वाढती गरज लक्षात घेऊन आणखी दोन कार्डिअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे कार्डिअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्सची एकूण संख्या चार होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेBudgetअर्थसंकल्पHealthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या