पहिल्या मजल्यावर 1 हजार मतदान केंद्रे
By Admin | Updated: October 2, 2014 23:33 IST2014-10-02T23:33:07+5:302014-10-02T23:33:07+5:30
अपंग, वृद्ध, आजारी मतदारांना मतदान करणो सोयीचे जावे, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात तात्पुरते रॅम्प उभारण्याचे करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

पहिल्या मजल्यावर 1 हजार मतदान केंद्रे
>पुणो : अपंग, वृद्ध, आजारी मतदारांना मतदान करणो सोयीचे जावे, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात तात्पुरते रॅम्प उभारण्याचे करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर रॅम्पची सुविधा देण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली. याशिवाय जिल्ह्यातील 1 हजार 59 मतदान केंद्रे पहिल्या मजल्यावर असून, तेथे ही सुविधा देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मतदान केंद्र पहिल्या मजल्यावर असल्यास अपंग, वृद्धांना मतदान करणो गैरसोयीचे होते. तसेच, अनेकदा तळमजल्यावर जाण्यासाठीदेखील अनेक पाय:या चढून जाव्या लागतात. तेथेदेखील रॅम्पची सोय नसते. त्यामुळे अनेकदा अस्थिव्यंग व वृद्ध व्यक्तींची अबाळ होते. त्यामुळे मतदान करण्यास टाळाटाळ केली जाते. याचादेखील विपरीत परिणाम मतदानावर होतो.
मतदानाच्या अदल्या दिवशीर्पयत रॅम्प तयार होतील. पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रात वृद्ध व अंपगांना नेण्यासाठी सहायक नेमणार आहेत.
सद्य:स्थितीतील पहिल्या मजल्यावर असलेली मतदान केंद्रे दुसरीकडे हलविल्यास मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. यामुळे पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्र तशीच ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
सामान्यांप्रमाणो अपंगांना मतदान केंद्रात जाण्यासाठी अडचण होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्र तळमजल्यावर असावे, मतदान केंद्रात पिण्याचे पाणी, वीज, शौचालयाची सोय करावी, असे आदेश दिले होते. मतदान केंद्रांची सद्य:स्थितीचे व्हिडीओ रेकॉर्डिग करून अहवाल पाठविण्याची सूचनादेखील आयोगाने केली होती. त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाने मतदान केंद्राची तपासणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यात 7 हजार 458 मतदान केंद्रे आहेत. यापैकी जवळपास 1 हजार 59 केंद्रांत रॅम्पची सुविधा केली जाणार आहे.