शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडिट कार्ड बंद होण्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक १ लाख ८६ हजारांचा ऑनलाईन गंडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 21:16 IST

बँक विलीन होणार असल्याचे दिले कारण....

पुणे : एका ज्येष्ठ नागरिकाला क्रेडिट कार्ड बंद होणार असल्याची बतावणी करुन गोपनीय माहिती घेऊन सायबर चोरट्यांनी १ लाख ८६ हजार रुपयांना गंडा घातला. केंद्र सरकारने बँका एकमेकात विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरट्यांनी फसवणुकीचा नवा फंडा निवडला आहे. 

सिंहगड रोडवरील आनंदनगर येथे राहणार्‍या एका ७६ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना ९ नोव्हेंबर रोजी एकाने फोन करुन बँक ऑफ बडोदा एल बीएस रोड या शाखेतून  बोलत असल्याची बतावणी केली. विजया बँक ही आपल्या बँकेत विलीन होणार आहे. तुमचे क्रेडिट कार्डस बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे कार्ड चालू ठेवायचे असेल, तर मी विचारेल तरी सगळी माहिती द्या, असे फिर्यादीला सांगून त्यांच्याकडून सगळी गोपनीय माहिती विचारली. त्यानंतर त्यांच्या दोन बचत खात्यामधून १ लाख ८६ हजार ९०० रुपये ऑनलाईन व्यवहार करुन काढून घेऊन फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे अधिक तपास करीत आहेत..........सायबर चोरट्यांचा नवा फंडाकेंद्र सरकारने नुकताच पाच बँका इतर मोठ्या बँकांमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जुन्या बँकांचे चेक बुक व इतर बाबी बदलून घेण्याचे आवाहन बँकांकडून केले जात आहे. त्याचाच गैरफायदा आता सायबर चोरटे घेऊ लागल्याचे दिसून येत आहे. कोणतीही बँक ग्राहकांना फोन करुन त्यांची गोपनीय माहिती विचारत नाही, त्यामुळे अशा फोनवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस