शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

१ कोटी लाच प्रकरण : तहसीलदार डोंगरेंसह पत्रकाराच्या पोलीस कोठडीत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 8:52 PM

डोंगरे यांना लाच प्रकरणी पकडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापडी गावी असलेल्या त्यांच्या बंगल्याची आणि बँकेतील लॉकरची झडती घेण्यात आली.

पुणे : वडिलोपार्जित समाईक ईनामी वर्ग शेत जमिनीचे वारस नोंदीचे निकालपत्र देण्यासाठी व तसे फेरफार करून ७-१२ नोंदी घेण्यासाठी १ कोटी रुपयांची लाच घेणा-या तहसीलदार सचिन महादेव डोंगरे याच्यासह पत्रकार किसन सोमा बाणेकर यांच्या पोलीस कोठडीत ३ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

        डोंगरे यांना लाच प्रकरणी पकडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापडी गावी असलेल्या त्यांच्या बंगल्याची आणि बँकेतील लॉकरची झडती घेण्यात आली. त्यात काहीच सापडले नसल्याचे पोलिसांनी न्यायालयास सांगितले. डोंगरे यांनी खासगी व्यक्ती किसन सोमा बाणेकर (वय ४०, रा़ लवळे, ता़ मुळशी) याच्या हस्ते डोंगरे यांनी ही रक्कम स्वीकारली आहे़  ६३ वर्षीय तक्रारदार यांची लवळे येथे वडिलोपार्जित सामाईक ईनामी ५ एकर शेत जमीन आहे़ ही शेतजमीन त्यांच्या सर्व भाऊ बंदाची फसवणूक करून प्रकाश कृष्णराव शितोळे यांनी परस्पर विकली़. याबाबत त्यांनी वेळोवळी वारस नोंदीबाबत तहसील कार्यालयाशी संपर्क साधला होता़ या वारसा नोंदीबाबतची फाईल मंत्रालयात गेली होती़ तेथील सचिवाने यातील कागदपत्रांची पुन्हा छाननी करुन अहवाल देण्यास मुळशी तहसीलदार सचिन डोंगरे यांच्याकडे पाठविली होती़. 

                तक्रारदारांनी वेळोवेळी याबाबत संपर्क साधून त्यांना निकालपत्र देण्याची विनंती केली़. तेव्हा त्यांनी निकालपत्र देण्यासाठी १ कोटी रुपयांची लाच मागितली़ त्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १४ डिसेंबरला केली होती़. त्याची पडताळणी केल्यानंतर शनिवारी (२९ डिसेंबर) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला़. लवासा रस्त्याजवळील उरवडे गावाजवळील एका कंपनीच्या गेटसमोर बाणेकर याच्यामार्फत १ कोटी रुपये स्वीकारताना डोंगरे यांना पकडण्यात आले़.  आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का तसेच पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली. तर डोंगरे यांनी तपासास सहकार्य केले असून मालमत्तेबाबत सर्व माहिती पोलिसांनी दिली आहे. कोठडीची मागणी करताना देण्याचे आलेले मुद्दे देखील जुने आहे. त्यामुळे कोठडीत वाढ करू नये, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. हर्षद निंभाळकर, अ‍ॅड. हेमंत झंजाड आणि अ‍ॅड नंदकुमार शिंदे यांनी केला.  

टॅग्स :PuneपुणेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग