पुणे : ससून रुग्णालयाशेजारील फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली आहे़ याप्रकरणी नरेंदर सुबरानी बागडी (वय २४, रा़ बाटा, राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागडी हे मूळचे राजस्थानमधील राहणारे असून पुण्यात काही महिन्यांपासून मोलमजुरी करतात आणि ससून शेजारील फुटपाथवर राहतात़ त्यांच्याबरोबर आणखी काही जण तेथे राहत आहेत़ दोनच दिवसांपूर्वी त्यांची पत्नी व मुलगा नसीब (वय १ वर्ष २ महिने) हे गावाकडून पुण्यात आले होते़ काल रात्री ते सर्व जण झोपले असताना पहाटे ३ ते सव्वाचार वाजण्याच्या दरम्यान त्यांच्याजवळ झोपलेल्या नसीब या मुलाला कोणीतरी उचलून नेले़ पहाटे जाग आल्यावर आपल्या शेजारी मुलगा नसल्याचे पाहून त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली व त्यानंतर समोर असलेल्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेतली़ बंडगार्डन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे़ परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासणीचे काम सुरु असून पोलीस अधिक तपास करीत आहेत़
ससून रुग्णालयाजवळील फुटपाथवरुन दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 15:01 IST
ससून रुग्णालयाशेजारील फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी नरेंदर सुबरानी बागडी (वय २४, रा़ बाटा, राजस्थान) यांनी फिर्याद दिली.
ससून रुग्णालयाजवळील फुटपाथवरुन दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण, गुन्हा दाखल
ठळक मुद्देबागडी हे मूळचे राजस्थानमधील राहणारे असून पुण्यात काही महिन्यांपासून करतात मोलमजुरी बंडगार्डन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा केला दाखल