शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीत शिवसेनेला भोपळा? विधान परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पारड्यात ३ जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 09:04 IST

Vidhan Parishad Election Results: विधानपरिषद पदवीधर-शिक्षक निवडणुकीत सहापैकी शिवसेनेच्या वाट्याला १ जागा आली होती. अद्याप दोन जागांचे निकाल लागायचे आहेत.

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये जोरदार धक्का देत विजयश्री खेचून आणली आहे. एकट्या भाजपा विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी लढत झाल्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आहे. परंतू शिवसेनेचा एकमेव उमेदवार पराभवाच्या छायेत आहे. 

सहापैकी चार पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचे निकाल लागले असून काँग्रेस, राष्ट्रवादीला तीन जागांवर विजय मिळाला आहे. तर एका जागेवर निकालाची प्रतिक्षा आहे. विरोधी पक्ष ठरलेल्या भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजपाचे अमरीश पटेल जिंकले आहेत. तर औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, पुणे पदवीधरमध्ये अरुण लाड विजयी झाले आहेत. 

पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर असून अद्याप निकाल लागायचा आहे. दुपारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तर नागपूर नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसच्या ॲड. अभिजित वंजारी यांनी दणदणीत विजय मिळविल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. 

शिवसेना अमरावतीत चितपट?विधानपरिषद पदवीधर-शिक्षक निवडणुकीत सहापैकी शिवसेनेच्या वाट्याला १ जागा आली होती. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेला अपक्ष उमेदवाराने तगडी लढत दिली असून शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत देशपांडे पराभवाच्या छायेत दिसत आहेत. अपक्ष उमेदवार  किरण सरनाईक हे आघाडीवर आहेत. निकाल अद्याप लागलेला नाही. काही वेळातच निकाल लागण्याची शक्यता आहे. 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या या पहिल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. धुळे-नंदुरबारमधून अमरीश पटेल यांचा विजय होताच भाजप नेत्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. पटेल यांनी ३३२ मते मिळवीत विजयाची हॅट् ट्रिक केली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना अवघी ९८ मते मिळाली.  

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस