शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

एक वर्षापूर्वी महाराष्ट्रातही पहाटे लव्ह जिहाद झाला, पण...

By बाळकृष्ण परब | Updated: November 24, 2020 08:53 IST

Shiv sena News :

ठळक मुद्देएक वर्षापूर्वी पहाटे लव्ह जिहाद झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले आणि टिकलेभाजपाने लव्ह जिहादची जी व्याख्या ठरवली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात अशी प्रकरणे कधी आणि किती घडली, ते समोर आणावेउगाच नसलेली थडगी उकरून काढून राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करू नये

मुंबई - सध्या गाजत असलेल्या लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपाला जोरदार टोला लावला आहे. लव्ह जिहादच्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ, या भ्रमातून भाजपावाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे लव्ह जिहाद झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले आणि टिकले. ते टिकणारच असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, लव्ह जिहादवरून सध्या भाजपाने आदळआपट सुरू केली आहे. हिंदू मुलींना मुस्लिम तरुण फूस लावून पळवून नेतात. त्यांचे धर्मांतरण करून निकाह लावतात. हा हिंदुत्वावर आघात आहे. त्याच लव्ह जिहाद असे नाव देण्यात आले. पाकिस्तान, चीनची घुसखोरी, जोर होणारे जवानांचे बलिदान, कोरोनाचे संकट, आर्थिक मंदीची लाट हे विषय गंभीर नसून लव्ह जिहाद हेच देशासमोरचे सगळ्यात भयानक संकट आहे आणि महाराष्ट्र सरकारनेही इतर राज्यांप्रमाणे लव्ह जिहादविरोधात कठोर कायदा करावा, अशी मागणी भाजपाच्या पुढाऱ्यांनी केली आहे. भाजपाने लव्ह जिहादची जी व्याख्या ठरवली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात अशी प्रकरणे कधी आणि किती घडली, ते समोर आणावे, पण उगाच नसलेली थडगी उकरून काढून राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.लव्ह जिहादचे प्रकार कुठे सुरू असतील तर ते पाकिस्तान आणि बांगलादेशात सुरू आहेत. पाकिस्तानातील हिंदू समाजातील महिला, मुली अत्यंत असुरक्षित जिणे जगत आहेत. त्यांना पळवून नेले जाते. त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करून निकाह लावले जातात. त्या दहशतीला कंटाळून अनेक हिंदू कुटुंबे पाकिस्तानातून पळून भारतात आश्रयाला आली आहेत. बांगलादेशातही काही वेगळे सुरू नाही. त्यामुळे लव्ह जिहादविरोधात शस्त्र उचलण्याची गरज तेथे आहे. अर्थात त्या परक्या प्रदेशात जाऊन भाजपा किंवा संघ परिवाराच आंदोलन वगैरे करता येणार नाही. पण केंद्रात मोदी सरकार असल्यामुळे लव्ह जिहाद प्रकरणी दम भरता येईल. एखादा सर्जिकल स्ट्राइकही करता येईल, असा चिमटा या अग्रलेखातून काढण्यात आला आहे.शिवसेनेचा हिंदुत्ववाद कायम आहे. मात्र आमचे हिंदुत्व म्हणजे खोमेनीछाप धार्मिक उन्माद आणि त्यावर तरारलेले राजकारण नाही. लव्ह जिहाद म्हणजे फक्त दोन भिन्न धर्मियांनी एकमेकांशी निकाह लावणे इथपर्यंत मर्यादित आहे काय? खरं सांगायचं तर वैचारिक लव्ह जिहादमुळे देशाचे आणि हिंदुत्वाचे सगळ्यात जास्त नुकसान झाले आहे. काश्मिरात पाकनिष्ठ, ३७० कलमप्रेमी मेहबूबा मुफ्तींशी भाजपाने सत्तेचा निकाह लावला हासुद्धा वैचारिक लव्ह जिहादचाच प्रकार का मानू नये? संघमुक्त मोदीमुक्त हिंदुस्तान असा डंका पिटणाऱ्या नितीश कुमारांना पुन्हा कडेवर घेऊन सत्तेचा निकाह लावला हासुद्धा लव्ह जिहादचाच प्रकार का मानू नये. हिंदुत्वाचे रक्षण सर्वच पातळीवर होणे गरजेचे आहे, असा सल्लाही या अग्रलेखातून देण्यात आला आहे.सर्वात महत्त्वाचं म्हणजे लव्ह जिहादची कायदेशीर व्याख्या ठरवावी लागेल. ही व्याख्या योगीजी किंवा शिवराजमामांनी ठरवली आणि देशाने स्वीकारली, असे होणार नाही. बिहारात भाजपाचे राज्य आहे आणि नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमारांचा अनुभव मोठा आहे. बिहारात लव्ह जिहादविरोधात कायदा भाजपा करणार असेल तर त्याच कायद्यातील मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र सरकारसाठी अभ्यासासाठी उपयोगी ठरतील. एखाद्या विषयाचे वैचारिक नेतृत्व करण्याची संधी बिहारलाही मिळू द्या, असा टोलाही सामनामधून लगावण्यात आला आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण