शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

"अनिल देशमुखांच्या निवासस्थानी १०० कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू, सीबीआयने कारवाई करावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 16:08 IST

Anil Deshmukh News : अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी आणि कार्यालयात असलेले १०० कोटींच्या प्रकरणासंदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, या प्रकरणी जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court)आज सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र या राजीनाम्यानंतर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुख यांच्यावर अजून एक गंभीर आरोप केला आहे. (Atul Bhatkhalkar Says, Work is underway to destroy evidence worth Rs 100 crore at Anil Deshmukh's residence, CBI should take action)

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे. या ट्विटमध्ये भातखळकर म्हणतात की, मी अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की, नुकताच राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी आणि कार्यालयात असलेले १०० कोटींच्या प्रकरणासंदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे.सीबीआयने तातडीने आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.  

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवास्थानी ठेवण्यात आलेल्या स्फोटकांचे प्रकरण उघडकीस आल्यापासून राज्याचे गृहमंत्रालय विरोधकांच्या निशाण्यावर आले होते. दरम्यान, या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा असलेला सहभाग आणि परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा केलेला आरोप यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले होते. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, या वसुली प्रकरणात मुंबई हायकोर्टाने आज सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकतेचा हवाला देत पदाचा राजीनामा दिला आहे. 

काय आहे १०० कोटी वसुली प्रकरण?सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना दरमहा १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते. हे पैसे बार, रेस्टॉरंट व अन्य आस्थापनांद्वारे कमावण्याची सूचना केली होती. तसेच पोलीस बदल्यांत आणि पोस्टिंगमध्येही भ्रष्टाचार होतो. तपासात राजकारण्यांचा हस्तक्षेप होत असल्याचे याचिकेत नमूद आहे. सरकारी वकिलांनी ही याचिका दाखल करून घेण्यावर आक्षेप घेतला. सिंग यांनी त्यांची बदली करण्यात आल्यानंतर याचिका दाखल केली. त्यांना आयुक्तपदावरून गृहरक्षक दलाची जबाबदारी दिल्याने त्यांनी ही याचिका दाखल केली, असे नमूद केले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAtul Bhatkalkarअतुल भातखळकर