शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

बिहार काँग्रेसमध्ये फूट पडणार? एनडीएची ताकद वाढणार; मांझींच्या ऑफरनंतर चर्चेला उधाण

By बाळकृष्ण परब | Updated: November 13, 2020 09:49 IST

Bihar Assembly Election News : बिहारमध्ये सत्तेत आलेली एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीमध्ये अगदी काही जागांचेच अंतर असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देहिंदुस्तानी अवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी यांनी काँग्रेसच्या आमदारांना दिलेल्या ऑफऱमुळे नव्या चर्चेचाल तोंड फुटले आहेमांझी यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहेबिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने १२५ जागा जिंकल्या आहेत

पाटणा - अत्यंत अटीतटीच्या झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने काठावरचे बहुमत मिळवत विजय मिळवला आहे. सत्तेत आलेली एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीमध्ये अगदी काही जागांचेच अंतर असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येण्याची शक्यता आहे. एकीकडे तेजस्वी यादव यांनी राज्यात महाआघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा केला असतानाच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी यांनी काँग्रेसच्या आमदारांना दिलेल्या ऑफऱमुळे नव्या चर्चेचाल तोंड फुटले आहे.बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान अवाम मोर्चाचे नेते जीननराम मांझी यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे आता बिहारमध्येही काँग्रेसमध्ये फूट पडणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसचे निवडून आलेले आमदार गोवा, गुजरात, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये पक्ष सोडून भाजपामध्ये गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मांझी यांच्या ऑफरमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडणे स्वाभाविक आहे.बिहार काँग्रेसमध्येही यापूर्वी फूट पडली होती. २०१७ मध्ये जेव्हा नितीश कुमार यांनी महाआघाडीपासून फारकत घेत पुन्हा एनडीएमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांच्यासह काही नेते काँग्रेस सोडून जेडीयूमध्ये आले होते. सध्या अशोक चौधरी हे जेडीयूचे कार्याध्यक्ष आहेत. तसेच नितीश कुमार यांचे खास व्यक्ती बनलेले आहेत. 

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने १२५ जागा जिंकल्या आहेत. त्यामध्ये भाजपाने ७४, जेडीयूने ४३, हम पक्षाने ४ आणि व्हीआयपी पक्षाने ४ जागा जिंकल्या आहेत. तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. त्यामध्ये आरजेडीला ७५, काँग्रेसला १९ आणि डाव्या पक्षांना १६ जागा मिळाल्या आहेत. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकHindustani Awam Morchaहिंदुस्थानी अवाम मोर्चाcongressकाँग्रेस