शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

पिंपरीत महापौरांचा राजीनामा आणि पुण्यात आनंदाच्या उकळ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 18:18 IST

पिंपरीत महापौर बदलणार असेल तर पुण्यातही लवकरच बदलेल या आशेवर असणाऱ्यांना महापौरपदाची स्वप्ने पडायला लागली आहेत. 

ठळक मुद्दे पुण्यात अनेकांना महापौर पदाचे दिवास्वप्न  बदल होण्याची शक्यता नाही : सध्याच्या पदाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण 

पुणे : राजकारणात कोण कुठल्या संधीचा उपयोग करून घेईल याचा अंदाज बांधणे कायमच कठीण असते. पुण्यातही सध्या अशीच परिस्थिती दिसत असून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे पुण्याच्या भाजपजनांना आनंद झालेला दिसत आहे. पिंपरीत महापौर बदलणार असेल तर पुण्यातही लवकरच बदलेल या आशेवर असणाऱ्यांना महापौरपदाची स्वप्ने पडायला लागली आहेत. 

 

                देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यावर पहिल्यांदाच बहुमताने पुणे महापालिकेतही भाजपने झेंडा रोवला आहे. सुरुवातीलाच महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला गटात पडल्याने अनुभवी नगरसेविका मुक्ता टिळक यांच्या गळयात पदाची माळ पडली. अर्थात पूर्वीच्या पुणे पॅटर्ननुसार दार सव्वा वर्षांनी महापौर पदासह सर्व पदे बदलली जायची.त्यामुळे भाजपही हाच कित्ता गिरवणार का याकडेही सर्वांचे लक्ष होते. त्यानुसार पिंपरी चिंचवडमध्ये तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महापौर आणि उपमहापौरांनी राजीनामे दिले असल्याची चर्चा आहे.

 

             आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर भावाभावासारखे असल्याने इथेही नेतृत्व बदल होईल अशी अनेकांना आशा आहे.इतकेच नव्हे तर बदल झाला तर कोण महापौर होईल याची चर्चाही रंगण्यास सुरुवात झाली आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी मात्र यापूर्वीच असा कोणताही बदल होणार नसल्याचे सांगितलेले आहे. दुसरीकडे विद्यमान पदाधिकारीही बदल होणार नसल्याचे छातीठोकपणे सांगितले आहे. मात्र तरीही अनेकांनी दिवास्वप्न रंगवण्यात धन्यता मानली आहे. 

       

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणBJPभाजपाMukta Tilakमुक्ता टिळक