शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

शेतकऱ्यांशी चर्चेचा ऑलिंपिक गेम सुरुय का? संजय राऊतांनी व्यक्त केला संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 10:35 IST

Sanjay Raut on Farmer protest : जय श्रीरामवरून कोणाला आक्षेप असण्याचे कारण नाही. हा आस्थेचा विषय आहे. ममतांदेखील श्रीरामवर आस्था ठेवतात, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. 

मुंबई : केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चेचा पहिले राऊंड, दुसरे राऊंड असे विक्रम करतेय. हा काही ऑलिम्पिक गेम सुरु आहे का? आशियाई गेम सुरु आहे का, खरेतर पहिल्याच दिवशी हा प्रश्न निकाली लागायला हवा होता. गेल्या ६० दिवसांपासून पंजाब. हरियाणाचा शेतकरी आंदोलन करत आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला फटकारताना संशयही व्यक्त केला आहे. 

पहिल्या राऊंडमध्येच न्याय मिळायला हवा होता. मला असे वाटतेय की यामागे एक अदृष्य शक्ती आहे. जिला देशातील वातावरण बिघडवायचे आहे. तसेच आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला.  भाजपाने तेव्हाच निर्णय घेतला असता तर त्याचा त्यांनाच फायदा झाला असता. परंतू प्रजासत्ताक दिनापर्यंत शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागणे हे दुर्दैव आहे. केंद्र सरकारला पुढे ते करावेच लागणार आहे, असे राऊत म्हणाले.  

जय श्रीरामवरून कोणाला आक्षेप असण्याचे कारण नाही. हा आस्थेचा विषय आहे. ममतांदेखील श्रीरामवर आस्था ठेवतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. जागतिक स्तरावरील जगातील शेतकऱ्यांच्या आंदोलनांपैकी अभूतपूर्व आंदोलन होत आहे. गेल्या 60 दिवसांपासून हे शेतकरी आंदोलन करत आहेत. राज्या राज्यांतूनही त्यांना पाठिंबा मिळत आहे. मुंबईतही शेतकरी जमा होत आहेत. मात्र, एक काळजी घ्यावी लागेल, कोरोना वाढण्याची शक्यता आहे. याची भीती मुख्यमंत्र्यांनाही वाटत असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी लढत आहेत. मैलोनमेैल पायपीट करून ते दिल्लीत, मुंबईत पोहोचलेत. भाजपाचे लोक आतूनच गुदमरले आहेत. प्रमुख लोकांनाही वाटतेय की प्रश्न सुटावा, असे राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे