शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू- आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 12:49 IST

प्रकाश आंबेडकर यांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ: सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू, असं वादग्रस्त विधान भारिपा बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. पुलवामाबद्दल बोलू नका, असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. मात्र आम्हाला हवं ते बोलण्याचा अधिकार घटनेनं दिला असताना अशा पद्धतीनं का रोखलं जातं, असा सवाल आंबेडकरांनी यवतमाळमध्ये एका जनसभेला संबोधित करताना विचारला. आम्ही सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला दोन दिवस तुरुंगात टाकू, असं वादग्रस्त विधान यावेळी त्यांनी केलं. यवतमाळमध्ये जनसभेला संबोधित करताना आंबेडकरांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. आयोग पक्षपातीपणे काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राजकीय पक्षांना पुलवामा हल्ल्यावर बोलू नका, अशी सूचना दिल्यावरुन आंबेडकरांनी आयोगावर घणाघाती हल्ला चढवला. 'जर घटनेनं आम्हाला हवं ते बोलण्याचा अधिकार दिला असेल, तर निवडणूक आयोगाकडून अशा सूचना कशा काय दिल्या जातात, हे जाणून घ्यायला मला आवडेल,' असं म्हणत सत्तेत आल्यास निवडणूक आयोगालादेखील सोडणार नाही, असा इशारादेखील त्यांनी दिला. 'सत्ता मिळाल्यास त्यांना दोन दिवस तुरुंगात टाकू. कारण निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करत नाही. भाजपाचा सहकारी पक्ष म्हणून त्यांचं काम सुरू आहे,' असा आरोप त्यांनी केला. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीसाठी एमआयएमशी आघाडी केली आहे. आंबेडकर भारिपा बहुजन महासंघ आणि एमआयएमच्या बहुजन वंचित आघाडीकडून सोलापूर आणि अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत. सोलापूरात त्यांच्यासमोर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचं आव्हान आहे. आंबेडकरांनी निवडणूक अर्ज भरताना जोरदार शक्तीप्रदर्शन केल्यानं या मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019