शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हाच पक्ष धनंजय मुंडेंवर कारवाई करेल; पवारांनी सांगितलं राजीनामा न घेण्यामागचं कारण 

By कुणाल गवाणकर | Updated: January 15, 2021 14:35 IST

धनंजय मुंडेंना मोठा दिलासा; पक्ष खंबीरपणे पाठिशी उभा राहणार

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सौम्य भूमिका घेतली आहे. महिलेचे आरोप ऐकून मी त्यासाठी गंभीर शब्द वापरला होता. मात्र मी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर अनेकांनी त्याच महिलेवर अतिशय गंभीर आरोप केले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. त्यात तथ्य आढळल्यास पक्षाकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असं शरद पवार म्हणाले. धनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिलेचा यू-टर्न?; “मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे, पण...”गायक महिलेनं बलात्काराचे आरोप केल्यानं धनंजय मुंडे अडचणीत सापडले. मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली जाऊ लागली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मुंडे यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला. याबद्दल शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. पक्षाच्या निर्णयामागची भूमिका त्यांनी यावेळी सांगितली. काल माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी महिलेनं केलेले आरोप मला माहीत होते. त्यामुळे मी त्याबद्दल बोलताना गंभीर असा शब्द वापरला. मात्र त्यानंतर तक्रारदार महिलेवरच एकापेक्षा अधिक गंभीर आरोप झाले आणि ते विविध पक्षातील लोकांनी केले, असं पवारांनी सांगितलं.धनंजय मुंडेंचा राजीनामा मागताना भाजपाने आपल्याकडे बघावे, सुनील केदार यांचा टोला'धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवर काल दिवसभरात काही जणांनी आरोप केले. विशेष म्हणजे आरोप करणाऱ्या व्यक्ती विविध पक्षातल्या आहेत. त्यातील एक व्यक्ती मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या पक्षातील आहे. संबंधित महिला ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप मुंडेसोबतच इतरांनीदेखील केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीत एखादी एसीपी दर्जाची महिला अधिकारी असायला हवी,' असं पवार म्हणाले.संबंधित महिलेवर तीन व्यक्तींनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे. महिलेवरच एकापेक्षा अधिक जणांनी गंभीर आरोप केल्यानं त्यावरून कोणावरही कारवाई करणं योग्य ठरणार नाही. ते अन्यायकारक असेल. त्यामुळे पोलीस तपास पूर्ण व्हायला हवा. त्यात तथ्य आढळल्यास पक्ष योग्य तो निर्णय घेऊन कारवाई करेल, असं पवार यांनी म्हटलं. त्यामुळे मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा