शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

दिंडोरीत माकपच्या उमेदवारीचा फायदा कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 05:05 IST

युती-आघाडीकडून आयात उमेदवार; राजी-नाराजीचा दोघांनाही फटका

- श्याम बागुलदिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत देत असलेल्या युती व आघाडीने आयात उमेदवारांनाच संधी दिल्याने दोन्ही पक्षांना राजी-नाराजीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, त्यात माकपने उमेदवारी जाहीर करून दोन्ही पक्षांपुढे पेच निर्माण केला आहे. माकपची उमेदवारी नेमकी कोणाला तारते आणि कोणाला मारते यावरच युती व आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.आदिवासी व बिगर आदिवासी मतदारांचा समावेश असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने तीन वेळा खासदार राहिलेले हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ऐवजी गेल्या निवडणुकीत भाजपविरुद्ध लढणाऱ्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्टÑवादीने डॉ. भारती पवार यांच्याऐवजी शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी दिली.ज्याप्रमाणे भाजपने उमेदवार बदलल्यामुळे नाराजीची भावना आहे, त्याचप्रमाणे, राष्टÑवादीमध्येदेखील आयात उमेदवारामुळे नाराजी बोलून दाखविली जात आहे. नेमका त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न माकपचे आमदार जिवा पांडू गावित यांनी चालविला आहे.आदिवासी कोकणा समाजाचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघातील प्रमुख तिन्ही उमेदवार त्याच समाजातील आहेत, शिवाय तिघांनाही राजकीय पार्श्वभूमी आहे. डॉ. भारती पवार यांचे सासरे दिवंगत ए. टी. पवार हे आठ वेळा आमदार राहिले आहेत. तर धनराज महालेयांचे वडील दिवंगत हरिभाऊ महाले हे तीन वेळा खासदार व दोन वेळा आमदार राहिले आहेत. जिवा पांडू गावित सात वेळा सुरगाणा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवार राजकीयदृष्ट्या ताकदीचे असल्याने कोण बाजी मारतो याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.युतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर आघाडीसाठी शरद पवार तसेच माकपासाठी सीताराम येचुरी यांची सभा या मतदारसंघात झाली. माकपाने मतदारसंघात जागर यात्रा काढून वातावरण निर्मिती केली आहे. प्रमुख तीन उमेदवारांमध्ये लढत असली, तरी कोण कोणाची मते खातो, यावर गणिते अवलंबून आहे. तूर्त प्रत्येकाची लढाई जिंकण्यासाठी व प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी आहे.गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने घरोघरी स्वच्छतागृह उभारण्यास प्रोत्साहन देऊन माता, भगिनींची अब्रू वाचविली. शेतमालाला भाव व शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले. आयुष्यमान योजनेने गरिबांचा उपचार खर्च उचलला.- डॉ. भारती पवार, भाजपसर्वच पातळीवर सरकार अयशस्वी ठरले. पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. उलट नोटबंदी, जीएसटीने जनता, शेतकºयांची फसवणूक केली. बेरोजगारी वाढविली. फसवे सरकार गेले पाहिजे.- धनराज महाले, राष्टÑवादीकळीचे मुद्देशेतमालाचे कोसळलेले भाव, गुजरातला वाहून जाणारे पाणीखासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या भाजपच्या मदतीविषयी साशंकता, कॉँग्रेस कार्यकर्ते प्रचारापासून दूर

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019dindori-pcदिंडोरीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस