शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जेव्हा सुधीर मुनगंटीवारांनी अमिताभ बच्चन यांना ऐकवला होता त्यांच्या चित्रपटातील डायलॉग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 13:37 IST

Lokmat interview with Sudhir Mungantiwar: अमिताभ बच्चन एकही पैसा न घेता आमच्या विभागाचे ब्रँड अँबेसेडर झाले होते.

मुंबई: भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात भाजपामधून केली आहे. मागील अनेक वर्षांपासून ते पक्षासाठी काम करत आले आहेत. राजकारणाची एक-एक पायरी चढत त्यांनी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अर्थमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. दरम्यान, अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांना त्यांच्याच एका चित्रपटातील डायलॉग एकवला होता. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला आहे. 

'त्या वेळे देवेंद्र फडणवीस यांना अर्थमंत्री व्हायचं होतं...'

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी फेस टू फेस या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत घेतली.  यावेळी मुनगंटीवार यांनी त्यांच्या शालेय आणि कॉलेज जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. सुधीर मुनगंटीवार यांना गाण्याची आवड आहे, हे अनेकांनाच माहित आहे. हाच धागा पकडून मुलाखतीत अतुल कुलकर्णी यांनी मुनगंटीवारांना त्यांच्या शालेय आणि कॉलेज जीवनातील काही आठवणी आणि गॅदरिंगमधील सहभागाविषयी प्रश्न विचारला. तसेच, त्यांना त्यांच्या आवडत्या चित्रपटातील एखादा डायलॉग बोलण्याची विनंती केली. त्यावर सुधीर मुगंटीवार म्हणाले की, 'आम्ही गॅदरिंगमध्ये नेहमी सहभाग घ्यायचो. अमिताभ बच्चन आमच्यासाठी मोठे नायक होते. मी अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांना त्यांच्याच 'त्रिशूल' चित्रपटातील एक डायलॉग एकवला होता.'

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, 'अर्थमंत्री झालो होतो तेव्हा राज्याच्या तिजोरीत पैसे नव्हते. सर्वत्र खनखनाट होता. मूळात मंत्रालयात तिजोरी ही प्रतक्षात नसतेच, हा फक्त बोलण्याचा एक भाग झाला. एके दिवशी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक बैठक होती, तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की, राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत. 'मेरे जेब मे फुटी कवडी नही, पर मै पांच लाख का सौदा करणे आया हू सेठ...' हा त्यांच्या त्रिशूल मधला डायलॉग त्यांना ऐकवला होता. त्यावर ते खूप हसले होते. याशिवाय, हमारे तिजोरी मे पैसे नही, पर मै जनता के कष्ट दुर करणे के लिये पैसे कम गिरणे नही दूंगा, असं अमिताभ यांना म्हटलं होतं. त्यावर अमिताभ यांनी एकही पैसा न घेता आमच्या विभागाचे ब्रँड अँबेसेडर झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपा