शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी व शेकापचे मुस्लीम समाजासाठीचे योगदान काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:28 IST

रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही भ्रष्ट प्रवृत्तीची असून, ही संस्थाने खालसा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

मुरुड : रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही भ्रष्ट प्रवृत्तीची असून, ही संस्थाने खालसा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शिवसेना व भाजपला जातीयवादी पक्ष म्हणून हिणवायचे, आमच्याबद्दल भीती निर्माण करावयाची व मुस्लिमांची मते मिळवायची; परंतु या राष्ट्रवादी व शेकापने एवढ्या वर्षात ही मते घेऊन मुस्लीम समाजासाठी कोणते विधायक काम केले आहे. फक्त मते घेतलीत, विधायक काम काही नाही. मतांच्या जीवावर या मंडळींनी कोट्यवधींची माया जमवली, म्हणूनच ही निवडणूक मी भ्रष्टचार विरुद्ध लढत असून या निवडणुकीत सदाचाराचा विजय निश्चित होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी मुरुड शहरात झालेल्या जाहीर सभेत केले आहे.मुरुड शहरात शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, या वेळी गीते बोलत होते. अनंत गीते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. बलशाली भारत बनवायचा असेल तर देशाचे नेतृत्व हे नरेंद मोदींकडे असणे खूप आवश्यक आहे.

आपल्या महाराष्ट्रात सिंचन घोटाळा घडल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांंना आत्महत्या करावी लागली आहे; परंतु हेच पैसे जर सिंचनात लागू केले असते तर बहुतांशी क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकरी सुजलाम सुफलाम झाला असता. या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नवीद अंतुले यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश म्हणजे ही एक ऐतिहासिक घटना असून नवीदला रायगड जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद भेटत असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. मला हरवण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले तरी मला त्यांचे आव्हान वाटत नाही. जनता सुज्ञ असून कोणाला मतदान करायचे हे त्यांना चांगले अवगत आहे. पुढील काळात कोकणाला सतावणारे प्रमुख प्रश्न पाणी व रस्ते यासाठी पाच हजार कोटी रुपये केंद्राकडून आणून विशेष विकास करणार असून, कोणताही तालुका टँकरग्रस्त राहणार नाही याची दक्षता घेणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. पैशाच्या मस्तीवर निवडणूक जिंकण्याचे दिवस आता संपले आहेत, मतदार हुशार झाला आहे. लोकांना कोण चांगला व वाईट हे कळत असून आगामी निवडणुकीत याची प्रचिती येणार आहे. पुढील काळात मुरुड नगरपरिषदेस केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे या वेळी सांगितले.
नवीद अंतुले यांनी कोकणच्या विकासाला खरी चालना शिवसेनाच देऊ शकते यासाठीच मी शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी उस्मान रोहेकर यांनी सांगितले की, मीना बाजारातील ५२ गाळे तोडले गेले व शेकडो लोक बेरोजगार झाले, गाळे तोडणार नाही, असे आश्वासन सुनील तटकरे यांनी दिले होते; परंतु नंतर फसवणूक केली, अशा लोकांचे शाप तटकरे यांना लागल्याशिवाय राहणार नाही, असे ते या वेळी म्हणाले.यावेळी नवीद अंतुले, भाजपचे अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस