शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Election Result 2021: भाजप-तृणमूलमध्ये टशन, पण एका माणसाला वेगळंच टेन्शन; 'नोकरी' जाणार की राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 12:30 IST

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: मोदी-शहांच्या झंझावातानंतरही तृणमूल २०० हून अधिक मतदारसंघात आघाडीवर; भाजप ८३ मतदारसंघात पुढे

कोलकाता: देशातील पाच राज्यांमधील निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मतमोजणीला सुरुवात होऊन तीन तास झाले असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. सुरुवातीला भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये कडवी लढत बघायला मिळत होती. मात्र आता तृणमूलनं जवळपास २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर तासाभरापूर्वी १०० च्या पुढे गेलेला भाजप आता ८० च्या जवळ येताना दिसत आहे.मोदी-शहांच्या झंझावातानंतरही बंगालमध्ये तृणमूल टेचात; पण ममता दीदी मोठ्या पेचातभाजपनं बंगालमध्ये ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांसह भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्री बंगालमध्ये प्रचाराला उतरले होते. मात्र तरीही भाजपला अपेक्षित जागा मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या एका दाव्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तृणमूलचे निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करत असलेल्या प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी सत्ता राखतील, असा दावा केला होता. भाजपला बंगालमध्ये १०० हून अधिक जागा मिळणार नाहीत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.बंगालमध्ये वेगळाच खेला होबे! भाजपवर उलटतेय VIP खेळी; रिकामी राहणार दिग्गजांची झोळी? तासाभरापूर्वी भाजपनं बंगालमध्ये शंभरच्यावर मतदारसंघात आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर त्यांचा आकडा खाली येत गेला. आता तो ८३ वर येऊन पोहोचला आहे. हात कल कायम राहिल्यास प्रशांत किशोर यांचा अंदाज अचूक ठरू शकतो. बंगालमध्ये भाजपला १०० हून अधिक जागा मिळाल्यास मी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणं बंद करेन आणि दुसरं काहीतरी काम सुरू करेन, असं किशोर म्हणाले होते. बंगालमध्ये भाजपनं १०० पेक्षा अधिक जागा जिंकल्यास तुम्ही मला दुसरं काहीतरी काम करताना बघाल. पण निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करताना मी तुम्हाला कधीही दिसणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Mamata Banerjeeममता बॅनर्जीPrashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपा