West Bengal Election Result 2021: मोदी-शहांच्या झंझावातानंतरही बंगालमध्ये तृणमूल टेचात; पण ममता दीदी मोठ्या पेचात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 11:55 AM2021-05-02T11:55:15+5:302021-05-02T12:05:32+5:30

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: तृणमूल काँग्रेसकडे मोठी आघाडी; पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पिछाडीवर

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights Trinamool Crosses Halfway Mark cm mamata banerjee trailing | West Bengal Election Result 2021: मोदी-शहांच्या झंझावातानंतरही बंगालमध्ये तृणमूल टेचात; पण ममता दीदी मोठ्या पेचात

West Bengal Election Result 2021: मोदी-शहांच्या झंझावातानंतरही बंगालमध्ये तृणमूल टेचात; पण ममता दीदी मोठ्या पेचात

googlenewsNext

कोलकाता: देशातील पाच राज्यांमधील निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मतमोजणीला सुरुवात होऊन तीन तास झाले असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. सुरुवातीला भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये कडवी लढत बघायला मिळत होती. मात्र आता तृणमूलनं जवळपास १९० जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप १०० जागांच्या आसपास पोहोचताना दिसत आहे.

बंगालमध्ये वेगळाच खेला होबे! भाजपवर उलटतेय VIP खेळी; रिकामी राहणार दिग्गजांची झोळी? 

मतमोजणीला सुरुवात होताच भाजप आणि तृणमूलमध्ये काँटे की टक्कर बघायला मिळाली. दोन्ही पक्षांमध्ये अतिशय कमी जागांचं अंतर होतं. मात्र तृणमूलनं शंभरी पार करताच जोरदार मुसंडी मारली. आता तृणमूल काँग्रेस पक्ष २०० च्या जवळ पोहोचला आहे. तर शंभरी पार केलेला भाजप आता खाली येताना दिसत आहे. एका तृणमूल काँग्रेसनं जोरदार आघाडी घेतली असताना दुसरीकडे ममता बॅनर्जी मात्र अडचणीत आल्या आहेत. 

नंदिग्राममधून निवडणूक लढवणाऱ्या ममता बॅनर्जी सध्या ७ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले ममता यांचे माजी सहकारी सुवेंदू अधिकारी विद्यमान मुख्यमंत्र्यांना कडवी लढत देत आहेत. भाजपचे अनेक दिग्गज उमेदवार पिछाडीवर असताना अधिकारी यांनी मात्र नंदिग्राममध्ये आघाडी घेतली आहे. अधिकारी ममता सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. मात्र निवडणुकीआधी त्यांनी कमळ हाती घेतलं. विशेष म्हणजे ममता बॅनर्जींनी सुवेंदू यांना आव्हान देताना केवळ एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे ममता यांचा पराभव झाल्यास तृणमूलसाठी तो मोठा धक्का असेल.

Web Title: West Bengal Assembly Election Result 2021 Highlights Trinamool Crosses Halfway Mark cm mamata banerjee trailing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.