शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

West Bengal Election Result 2021: चार M अन् भाजपचा गेम! एकट्या दीदी मोदी-शहांवर भारी; M फॅक्टरनं बजावली मोलाची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 17:01 IST

West Bengal Election Result 2021: पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला मोठी आघाडी; ममता बॅनर्जींचा नंदिग्राममध्ये विजय

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा त्यांचा करिश्मा दाखवून दिला आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला २०० हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत. तर भारतीय जनता पक्षाला ७५ च्या आसपास जागांवर यश मिळताना दिसत आहे. ममता बॅनर्जींचा पराभव करण्यासाठी, राज्यात सत्ताबदल घडवण्यासाठी भाजपनं जंगजंग पछाडलं. मात्र तरीही ममता बॅनर्जींनी हॅटट्रिक केली आहे. ममता बॅनर्जींच्या विजयात ४ एम महत्त्वाचे ठरले.आता थांबायचंय, आयुष्यात दुसरं काहीतरी करेन; प्रशांत किशोर यांची 'राजनीती' सोडण्याची घोषणामतुआ समाजाची साथमतुआ समाजाची लोकसंख्या पश्चिम बंगालमध्ये २ कोटी इतकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये मतदान सुरू असताना बांगलादेश दौऱ्यावर होते. त्यावळी त्यांनी तिथे मतुआ समाजाच्या देवळात जाऊन पूजा केला. मात्र याचा कोणताही भाजपला मतदानात झालेला दिसला नाही.बंगालमध्ये दिदींचाच खेला! सर्व एक्झिट पोलचा अंदाज चुकला; भाजपला दे धक्कामुस्लिम मतदार ममतांसोबतजय श्रीराम म्हणत केलेली घोषणाबाजी, बेगम म्हणत ममता यांच्यावर केलेली टीका यांच्या माध्यमातून मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपनं केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींनी बंगालमध्ये उमेदवार दिले होते. मात्र तरीही मुस्लिम मतदारांनी ममतांना साथ दिली.महिलांचा दिदींना पाठिंबाराज्यातील महिला मतदारांनी तृणमूलला भरभरून मतदान केलं. बिहारमधील महिला मतदार नितीश कुमार यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या. त्याचा फायदा संयुक्त जनता दलासह भाजपलाही झाला. मात्र पश्चिम बंगालमध्ये त्याच्या अगदी उलट घडलं.ममता नावाचा ब्रँडममता बॅनर्जी यांच्या पायाला झालेली जखम, त्यांनी व्हिलचेअरवरून केलेला प्रचार यावरून भाजपनं त्यांना लक्ष्य केलं. मात्र त्याचा नेमका उलटा परिणाम दिसला. पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेत 'दीदी ओ दीदी' म्हणत ममतांवर निशाणा साधला. ममता यांच्यावर केलेल्या शेरेबाजीचा भाजपला फटका बसला. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी