शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Election : अमित शाहंचा ममता बॅनर्जींवर पलटवार; म्हणाले, "हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, पण मी याला षडयंत्र..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 15:30 IST

West Bengal Election : ममता बॅनर्जींवर अमित शाहंनी साधला निशाणा

ठळक मुद्देअमित शाहंनी केला ममता बॅनर्जींवर पलटवारममता बॅनर्जींना झालेली दुखापत षडयंत्र असल्याचा करण्यात आला होता दावा

पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केला. आज आपलं हेलिकॉप्टर खराब झालं. परंतु आपण याला षडयंत्र म्हणणार नाही असं म्हणत अमित शाह यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला."आज मला येण्यास थोडा उशिर झाला. माझ्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता. परंतु हे कोणाचं षडयंत्र होतं असं मी बिलकुल म्हणणार नाही," असं अमित शाह यावेळी म्हणाले. निवडणूक आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना झालेली दुखापत हा एक अपघात आहे. परंतु ममता बॅनर्जींच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या मागे एक षडयंत्र आहे, असं म्हणत अमित शाह यांनी त्यांच्यावर टीका केली. "ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली. परंतु ती कशी झाली याची माहितीच नाही. तृणमूल काँग्रेसचं म्हणणं आहे की यामागे काही षडयंत्र आहे. परंतु निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार हा केवळ एक अपघात होता. दीदी (ममता बॅनर्जी) तुम्ही पूर्ण पश्चिम बंगाल व्हिलचेअरवर फिरत आहात. आपल्या पायाबाबत चिंता आहे. परंतु तुम्हाला आमच्या १३० कार्यकर्त्यांच्या मातांबद्दल मात्र कोणतीही चिंता नाही, ज्यांच्या मुलांची हत्या करण्यात आली," असं अमित शाह म्हणाले. हल्ला नाहीपश्चिम बंगालमधील निवडणुकांमुळे राजकारण तापले असून, मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी रविवारी जनतेसह विरोधकांना ‘सरप्राईज’ दिलं. प्रचार करताना जखमी झालेल्या ममतांनी ‘व्हीलचेअर’वर बसून चक्क ‘रोड शो’ केला. पाच किलोमीटरच्या या ‘रोड शो’मध्ये सहभागी होण्याअगोदर ‘मी अजूनही वेदना सहन करते आहे’, असे ट्वीट करत समर्थकांना भावनिक सादच घातली. दरम्यान, नंदीग्राम येथे ममता बॅनर्जी यांच्यावर कुठलाही हल्ला झाला नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Amit Shahअमित शहाBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिका