शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

हीच ती वेळ! उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींना पत्र; देशात महाआघाडी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 17:01 IST

भाजपला टक्कर देण्याची तयारी; ठाकरे, पवार, गांधींना पाठवलेल्या पत्रामुळे देशात महाआघाडी?

कोलकाता/नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला असल्यानं पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर भारतीय जनता पक्षानं मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी सलग तिसरी निवडणूक जिंकणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. (west bengal election lets fight bjp unitedly cm mamata banerjee writes to sonia gandhi sharad pawar uddhav thackeray)"हो, मी भाजपा नेत्याला फोन केला होता पण..."; ममता बॅनर्जींनी सांगितलं त्यामागचं नेमकं राज'कारण'बंगालमध्ये एकूण ८ टप्प्यांत मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान जवळ आलं असताना ममता बॅनर्जींनी देशातल्या भाजपेतर पक्षाच्या प्रमुखांना पत्र लिहिलं आहे. भाजप सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरोधात एकजुटीनं उभं राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपल्याला सोबत येऊन भाजपचा मुकाबला करायला हवा, असं आवाहन बॅनर्जींनी केलं आहे.फोकस नंदीग्राम; ममतांसाठी प्रतिष्ठेची लढत, भाजपकडून संपूर्ण ताकद पणाला; १ एप्रिल रोजी मतदानममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एम. के. स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल, नवीन पटनायक, जगन रेड्डी, के. एस. रेड्डी, फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि दीपांकर भट्टाचार्य यांनी पत्र लिहून पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.नॅशनल कॅपिटल टेरिटरी कायद्यातील सुधारणेला विरोधमोदी सरकारनं संसदेत नॅशनल कॅपिटल टेरिटरी कायद्यात सुधापणा करणारं विधेयक मंजूर केलं. या विधेयकाला बॅनर्जींनी विरोध दर्शवला. मोदी सरकारनं पारित करून घेतलेलं विधेयक संघराज्य पद्धतीला धक्का लावणारं असल्याचं बॅनर्जींनी पत्रात म्हटलं आहे. विरोधी पक्षाची सरकारं असलेल्या राज्यांमध्ये अशाच प्रकारे राजकारण सुरू आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये राज्यपालांच्या माध्यमातून लोकनियुक्त सरकारच्या कारभारात अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपा