शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

अडीच वर्षात मिथुन चक्रवर्तीं केवळ ३ दिवस चढले होते संसदेची पायरी; नंतर राजकारणाला ठोकला होता रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 19:36 IST

West Bengal Election 2021 : चार वर्षांच्या राजकीय सन्यासानंतर पुन्हा केला राजकारणात प्रवेश, हाती घेतला भाजपचा झेंडा

ठळक मुद्देचार वर्षांच्या राजकीय सन्यासानंतर पुन्हा केला राजकारणात प्रवेशरविवारी हाती घेतला भाजपचा झेंडा

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांचा यापूर्वीचा राजकीय प्रवास हा फारच छोटा होता. चार वर्षांच्या राजकीय सन्यासानंतर त्यांनी रविवारी पुन्हा राजकारणात येत भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. तसंच ते तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवरही गेले होते. २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी मिथुन चक्रवर्ती यांना राजकारणात प्रवेश करण्याचं निमंत्रण दिलं. त्यावेळी मिथुन चक्रवर्ती यांनीदेखील ते स्वीकारलं. २०१४ मध्ये तृणमूल काँग्रेसकडून मिथुन चक्रवर्ती हे राज्यसभेवरही पोहोचले. परंतु आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केवळ तीन वेळाच राज्यभेत उपस्थिती लावली होती. २०१५-१६ मध्ये शारदा चिटफंड घोटाळ्यात मिथुन चक्रवर्ती यांचं नाव जोडलं गेलं, त्यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये त्यांनी आपला राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राजकारणापासून लांबच राहणं पसंत केलं. परंतु चार वर्षांनंतर आता पुन्हा एकदा त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते राजकारणात प्रवेश करतील अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.  शनिवारी रात्री भाजपचे राज्याचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी कोलकात्यातील बेलगाचिया या ठिकाणी मिथुन चक्रवर्ती यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या प्रवेशाचं चित्र स्पष्ट झालं होतं.शारदा कंपनीचे ब्रँड अँबेसेडर मिथुन चक्रवर्ती हे शारदा कंपनी ब्रँड अँबेसेडर होते. अंमलबजावणी संचालनालयानं त्यांची या प्रकरणी चौकशीही केली होती. त्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी जवळपास १.२० कोटी रूपये परत केले होते. तसंच आपल्याला याच्याशी जोडलं जायचं नसल्याचंही म्हटलं होतं. तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होण्यापूर्वी डाव्या पक्षांच्या सरकारदरम्यान मिथुन चक्रवर्ती यांना तत्कालिन क्रीडा मंत्री सुभाष चक्रवर्ती यांचे निकटवर्तीय मानलं जात होतं. परंतु त्यांनी जेव्हा ममता बॅनर्जींच्या पक्षासह जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. परंतु आता पुन्हा एकदा त्यांच्या निर्णयानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.  

टॅग्स :Mithun Chakrabortyमिथुन चक्रवर्तीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी