पश्चिम बंगालमध्ये मतदानवाढीचा फायदा कुणाला? होताहेत दावे-प्रतिदावे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 04:57 AM2021-03-29T04:57:25+5:302021-03-29T04:58:55+5:30

West Bengal Assembly Elections 2021 :पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे राजकीय पंडितांकडून विविध कयास लावण्यात येत आहेत.

West Bengal Assembly Elections 2021 : Who benefits from the increase in turnout in West Bengal? There are counter-claims | पश्चिम बंगालमध्ये मतदानवाढीचा फायदा कुणाला? होताहेत दावे-प्रतिदावे

पश्चिम बंगालमध्ये मतदानवाढीचा फायदा कुणाला? होताहेत दावे-प्रतिदावे

Next

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे राजकीय पंडितांकडून विविध कयास लावण्यात येत आहेत. (West Bengal Assembly Elections 2021 )दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस व भाजपाकडून मतदानवाढीचा फायदा आपल्यालाच होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीचा नेमका फायदा कुणाला होईल व पुढील सात फेऱ्यांवर त्याचा काय परिणाम होईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Who benefits from the increase in turnout in West Bengal? There are counter-claims)

पहिल्या टप्प्यातील ३० जागांपैकी २६ वर भाजपाचा विजय होईल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहा यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी असा दावा कसा काय करण्यात येतो हे कोडेच आहे. त्यांनी सर्वच ३० जागांवर विजयाचा दावा का नाही केला. उर्वरित जागा कॉंग्रेस व माकपासाठी सोडल्या आहेत का असा प्रश्न ममता यांनी उपस्थित केला. ८४ टक्के मतदान झाले असून नक्कीच लोकांनी आमच्या बाजूने मतदान केले आहे. आम्ही कुठलाही अंदाज लावणार नाही, असे ममता यांनी सांगितले. 
पश्चिम बंगालमध्ये यंदा झालेले अधिकचे मतदान हा सत्ताधाऱ्यांविरुद्ध कौल असू शकतो, असा एकमत प्रवाह आहे. तर ममता बॅनर्जी यांना झालेल्या अपघातानंतर त्यांना पुन्हा समर्थन मिळत आहे, असाही दावा होत आहे.

Web Title: West Bengal Assembly Elections 2021 : Who benefits from the increase in turnout in West Bengal? There are counter-claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.