शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

West Bengal Election 2021: बंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यास देशव्यापी संदेश जाईल - यशवंत सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 21:10 IST

West Bengal Election 2021: शनिवारीच यशवंत सिन्हा यांनी केला होता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

ठळक मुद्देशनिवारीच यशवंत सिन्हा यांनी केला होता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेशदीर्घकाळापासून ते सक्रीय राजकारणापासून होते दूर

पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. राजकीय वातावरणही तापलं आहे. याच दरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री म्हणून जबाबदारी हाताळणारे यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर यशवंत सिन्हा दीर्घकाळापासून सक्रीय राजकारणातून दूर होते. त्यानंतर आता शनिवारी सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी भाजपवर निशाणा साधला. "पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला पाहिजे. तेव्हा देशव्यापी आश्वासानाचा संदेश जाईल. मी कोणत्याही अटींशिवाय ममता बॅनर्जींना समर्थन दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल," असा विश्वासही सिन्हा यांनी व्यक्त केला. यशवंत सिन्हा यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. "मी त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या आपली लढाई लढत आहेत. त्या बंगालची लढाई लढत आहेत, त्या राष्ट्रासाठीही लढत आहेत. बंगालच्या निवडणुकांचा ज्या प्रकारे भाजपनं प्रचार केला त्यावरून हा राष्ट्रीय महत्त्व असलेली निवडणूक झाली आहे," असं ते म्हणाले. "यासाठी ममता बॅनर्जी यांचा विजय होणं महत्त्वाचं आहे आणि बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला पाहिजे. यातून एक देशव्यापी संदेश जाईल," असंही सिन्हा म्हणाले. यावेळी ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापतीवरही त्यांनी वक्तव्य केलं. भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांद्वारे खोटं पसरवण्यात आलं. असं असलं तरी नंदीग्राम येथे त्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायावर प्लॅस्टर लावण्यात आलं होतं. त्यांना अन्य ठिकाणीही दुखापत झाली आहे. यानंतरही त्या निवडणुकीचा प्रचार करत असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाYashwant Sinhaयशवंत सिन्हाBJPभाजपा