शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

भाजप कार्यकर्त्याच्या आईच्या मृत्यूवरून आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 5:25 AM

West Bengal Assembly Elections 2021 : तृणमूल काँग्रेस समर्थकांच्या हल्ल्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या जखमी झालेल्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपने सोमवारी केला आहे.

कोलकता : तृणमूल काँग्रेस समर्थकांच्या हल्ल्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या जखमी झालेल्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपने सोमवारी केला आहे. प. बंगालच्या २४ वा परगणा जिल्ह्यात निम्ता भागात तृणमूल कॉंग्रेस समर्थकांनी गेल्या महिन्यात केलेल्या हल्ल्यात त्या जखमी झाल्या होत्या.भाजप कार्यकर्त्यांनी निम्ता पोलीस ठाण्यासमोर या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने केली. तसेच एम. बी. रस्त्यावर टायर जाळले. भाजप कार्यकर्त्यांच्या आईचा मृत्यू तृणमूल कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात झालेला नसून, त्यांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाल्याचा दावा तृणमूल कॉंग्रेसतर्फे करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीटद्वारे या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.केंद्रीय मंत्री देबश्री चौधरी यांनी सांगितले, की २७ फेब्रुवारीला या ज्येष्ठ महिलेवर तिच्या निवासस्थानी  तृणमूल कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर येथील रुग्णालयात २७ दिवस उपचार सुरू होते. हे आरोप फेटाळताना तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सौगता रॉय यांनी सांगितले, की या घटनेचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. भाजप विनाकारण या ज्येष्ठ महिलेच्या मृत्यूवरून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे. कोणताही मृत्यू दुर्दैवी आणि दु:खदायक असतो. मात्र, या महिलेवर जर कोणता हल्ला झाला असेल तर त्यात तृणमूल कॉंग्रेस समर्थक-कार्यकर्त्यांचा अजिबात हात नाही. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू वृद्धापकाळामुळे झालेल्या विकारांमुळे झालेला आहे.हिंसाचारमुक्त  बंगालसाठी कटिबद्ध‘’तृणमूल पक्षाच्या गुंडांकडून झालेल्या निर्दयी मारहाणीत बंगालच्या कन्या शोवा मुजूमदार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अत्यंत अस्वस्थ आहे. त्यांच्या मृत्यूने मुजूमदार कुटुंबीयांना झालेल्या वेदना आणि त्यांचा तळतळाट ममता दीदींनाही भोगावा लागेल. हिंसाचारमुक्त भवितव्यासाठी, आपल्या माय-भगिनींसाठी सुरक्षित राज्य होण्यासाठी बंगाल कटिबद्ध आहे व त्यासाठी बंगाल संघर्ष करेल.”     - अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१