शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

"एकजूट झाले ३० टक्के मुसलमान, तर भारतात बनतील चार पाकिस्तान,’’ तृणमूलच्या नेत्याची मुक्ताफळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 16:28 IST

West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमधील प्रचारादरम्यान, काही नेते पातळी सोडून आक्षेपार्ह विधाने करत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आलम यांनी असेच एक संतापजनक विधान केले आहे.

कोलकाता - संपूर्ण देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीला २७ मार्चपासून सुरुवात होत आहे. (West Bengal Assembly Elections 2021 )आज संध्याकाळी राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार संपणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. या प्रचारादरम्यान, काही नेते पातळी सोडून आक्षेपार्ह विधाने करत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आलम यांनी असेच एक संतापजनक विधान केले आहे. ( "30 per cent Muslims unite, four Pakistan will be formed in India," says Trinamool leader Sheikh Alam)

मिळत असलेल्या माहितीनुसार वीरभूम जिल्ह्यातील नानूर विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विधानचंद्र मांझी यांचा प्रचार करण्यासाठी शेख आलम हे आले होते. त्यावेळी शेख आलम म्हणाले की, जर भारतातील ३० टक्के मुसलमान एकजूट झाले तर भारतामध्ये चार नवे पाकिस्तान बनू शकतात. दरम्यान, शेख आलम यांच्या विधानावरून भाजपाने तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली आहे.  आलम यांच्या या विधानावर भाजपाचे पश्चिम बंगालमधील सह प्रभारी अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जींना सवाल विचारला आहे. ममता बॅनर्जी आलम यांच्या विधानाला पाठिंबा देतात काय. आपल्याला असा बंगाल हवा आहे का? असा सवाल  अमित मालवीय यांनी विचारला आहे. 

 

दरम्यान २०१६ च्या विधानसभा निवडणुकीवेळीही अशाच प्रकारचे विधान एका मंत्र्याने केले होते. त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हुसेन यांनी मिनी पाकिस्तानचा उल्लेख केला होता. फिरहाद हकीम पाकिस्तानच्या एका पत्रकाराला मी तुम्हाला आता कोलकाताधील मिनी पाकिस्तानमध्ये घेऊन जातो, असे म्हटले होते. त्यावेळी त्यांच्या या विधानावर जोरदार टीका झाली होती.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Trinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा