शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
4
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
5
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
6
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
7
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
8
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
9
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
10
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
11
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
12
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
13
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
14
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
15
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
16
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
17
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
18
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
19
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
20
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज

West Bengal Election Result 2021 Highlights: खेला होबे की खेळ संपणार? देशभरातील ५ राज्यांच्या ८२२ जागांना फक्त नंदीग्रामची एक सीट भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 10:11 AM

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: ममता या अधिकारी यांना काहीही करून पाडणार याच निश्चयाने तिथे लढत आहेत. नंदीग्रामची जागा 2009 पासून तृणमूलच्या ताब्यात आहे. 2016 मध्ये तिथे तृणमूलला एकूण 87 टक्के मतदान झाले होते.

देशभरात आजचा दिवस कोरोना काळातील हायव्होल्टेज निवडणुकांच्या निकालाचा आहे. निवडणूक आयोगाने कोणीही जल्लोष करू नये असे आदेश दिले आहेत. तरीही ही निवडणूक भाजपासाठी मोठा जल्लोष करण्यासारखी असणार आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये 3 वरून तीन आकडी जागा मिळविताना ममता बॅनर्जी (Mamata banrejee) यांचा पराभव आणि त्यांच्या सत्तेचे पतन अशा दोन गोष्टी भाजपाला साधण्याची संधी चालून आली आहे. (Mamata banerjee is trailing from Nandigram.)

पहिल्या पोस्टल मत मोजणीमध्ये एकेकाळचे ममता यांचे सहकारी सुवेंदू अधिकारी हे पुढे असून ममता या 1500 मतांनी पिछाडीवर आहेत. महत्वाचे म्हणजे देशभरात जवळपास 822 मतदारसंघांमध्ये निवडणूक झाली आहे, यापैकी नंदीग्राम ही अशी एकच सीट आहे जी या साऱ्यांवर भारी पडली आहे. कारण ममता या अधिकारी यांना काहीही करून पाडणार याच निश्चयाने तिथे लढत आहेत. नंदीग्रामची जागा 2009 पासून तृणमूलच्या ताब्यात आहे. 2016 मध्ये तिथे तृणमूलला एकूण 87 टक्के मतदान झाले होते. सुवेंदू अधिकारी यांनी सीपीएमच्या अब्दुल कबीर यांचा 81,230 मतांनी पराभव केला होता. हाच मतदारसंघ बंगालचे पुढील राजकारण आणि सत्तासंघर्षाची दिशा निश्चित करणार आहे. नंदीग्राममधून आठ जण निवडणूक लढवत आहेत. 

आरोप प्रत्यारोपपश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या बंगालला मिनी पाकिस्तान बनवतील असा गंभीर आरोप त्यांचा पक्ष सोडून भाजपामध्ये गेलेले बडे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांना धडा शिकविण्यासाठी ममता त्यांच्याविरोधात नंदीग्राममधून लढत आहेत. आता ममता यांनी जवळपास 14 वर्षे जुन्या घटनेचा डाव खेळला होता. तजमिनीच्या अधिग्रहनाविरोधातील ऐतिहासिक आंदोलनावेळी 14 मार्च 2007 ला पिता-पुत्राला माहिती न देता पोलीस नंदीग्राममध्ये येऊच शकत नव्हते, असा आरोप केला होता. हे तेच नंदीग्राम आहे, ज्या शेतकरी आंदोलनाद्वारे ममता बॅनर्जी आज राज्याच्या नेत्या बनल्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी; ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर

काय होती घटना...ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामयेथून शेतजमिन अधिग्रहण करण्याविरोधात आंदोलन सुरु केले होते. जानेवारी 2007 मध्ये सीपीएमचे आंदोलक आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. तर 14 मार्च 2007 या दिवशी नंदीग्राममध्ये 14 लोकांचा पोलीस फायरिंगमध्ये मृत्यू झाला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021