शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

Assembly Election Result 2021 : आता दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरुस्त करायला लागा; प्रकाश राज यांचा नरेंद्र मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 3:13 PM

पश्चिम बंगालमध्ये सध्याच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.

ठळक मुद्देप्रकाश राज यांची नरेंद्र मोदी यांच्यावर टीकापश्चिम बंगालमध्ये सध्याच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. दरम्यान, या ठिकाणी तणमूल कांग्रेसला लक्ष्य करत भाजपनं २०० जागा जिंकण्याचा दावा केला होता. परंतु दुसरीकडे मतदारांनी तृणमूल काँग्रेसलाच मतदान केल्याचं दिसून येत आहे. पश्चिम बंगालमधील विजयासाठी भाजपनं जोर लावला होता. भाजपच्या जागा जरी वाढताना दिसत असल्या तरी तृणमूल काँग्रेसची सत्ताही कायम राहणार असल्याचंच चित्र निर्माण झालं आहे. दरम्यान, यानंतर अभिनेते प्रकाश राज यांनी टोला लगाला आहे. "डन अँड डस्टेड! प्रिय सर्वोच्च नेते, द्वेष आणि विषाणू पसरवणं थांबवा. नागरिकांना स्पष्टपणे म्हटलं आहे. चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करायला लागा. जीवन महत्त्वाचं आहे," असं म्हणत प्रकाश राज यांचा नरेंद्र मोदींना टोला लगावला. सध्याच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती. परंतु सर्वांचं लक्ष हे पश्चिम बंगालच्या निवडणुकांवर लागून होतं. त्यातही ममता बॅनर्जी निवडणुकीला उभ्या असलेल्या जागेवर अनेकांचं लक्ष होतं. दरम्यान, या ठिकाणी ममता बॅनर्जी विजयी होणार का की सुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींचा पराभव करणार हे पाहावं लागणार आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Narendra Modiनरेंद्र मोदीPrakash Rajप्रकाश राज