शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2021: बंगालमध्ये भाजपा हरला! मोदी-शाहांचा करिश्मा खरोखरच ओसरला?

By बाळकृष्ण परब | Updated: May 3, 2021 17:41 IST

Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा करिश्मा ओसरल्याची तसेच भाजपाचे अच्छे दिन संपल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

ठळक मुद्देसर्वतोपरी प्रयत्न करूनही भाजपाला पश्चिम बंगालमध्ये जेमतेम ८० जागाही जिंकता आल्या नाहीतभाजपाने बंगालमध्ये लावलेला जोर आणि करण्यात येत असलेले दावे याच्या तुलनेत भाजपाला मिळालेल्या जागा फार कमी मात्र २०११ आणि २०१६ च्या विधानसभा निवडणुकांशी तुलना केली असता अगदी पाच सहा वर्षांपूर्वीपर्यंत बंगालमध्ये अस्तित्वातही नसलेल्या भाजपाने अल्पावधीत घेतलेली झेप लक्षवेधी

- बाळकृष्ण परब संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंदालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसनेभाजपाला धोबीपछाड देत दणदणीत विजय मिळवला. (West Bengal Assembly Election 2021) बंगालमध्ये नरेंद्र  मोदींच्या (Narendra Modi) झंझावाती सभा आणि दोनशेहून अधिक जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या अमित शाहांच्या ( Amit Shah) आक्रमक प्रचारानंतरही भाजपाला १०० जागाही जिंकता आल्या नाहीत. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा करिश्मा ओसरल्याची तसेच भाजपाचे अच्छे दिन संपल्याची चर्चा सुरू झाली आहे. ( BJP loses in West Bengal! Did Narendra Modi- Amit Shah's charisma really end?)

२०१९ च्या लोकसभा निलडणुकीत पश्चिम बंगालमध्ये अनपेक्षित यश मिळाल्यानंतर भाजपाला बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पडू लागले होते. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी बंगालवर लक्ष केंद्रीत केले. तसेच बंगालमधील सत्ताधारी असलेल्या ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करण्याचे हरतऱ्हेने प्रयत्न सुरू केले. ममतांचे निकटवर्तीय असलेल्या अनेक नेत्यांनाही भाजपात आणले. मात्र एवढे सर्व करूनही भाजपाला पश्चिम बंगालमध्ये जेमतेम ८० जागाही जिंकता आल्या नाहीत. भाजपाने बंगालमध्ये लावलेला जोर आणि करण्यात येत असलेले दावे याच्या तुलनेत भाजपाला मिळालेल्या जागा फार कमी आहेत. त्यामुळे मोदी, शाहांचा करिश्मा संपला असे दिसणे साहजिकच आहे.

मात्र २०११ आणि २०१६ च्या विधानसभा निवडणुकांशी तुलना केली असता अगदी पाच सहा वर्षांपूर्वीपर्यंत बंगालमध्ये अस्तित्वातही नसलेल्या भाजपाने अल्पावधीत घेतलेली झेप लक्षवेधी आहे. या निवडणुकीत भाजपाला ७५ च्या आसपास जागा आणि ३७ टक्के मते मिळाली आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाला १८ जागा आणि ४० टक्क्यांच्या आसपास मते मिळाली होती. याचा अर्थ बंगालमध्ये भाजपाने आपला हक्काचा हिंदुत्वाच्या विचारावर आधारित मतदार उभा केला आहे, असा होतो. दुसरीकडे एकेकाळी बंगालमध्ये दीर्घकाळ सत्तेत राहणारे काँग्रेस आणि डाव्या पक्षांना भोपळाही फोडता आलेला नाही. तसेच त्यांना फारशी मतेही मिळालेली नाहीत. त्यामुळे बंगालमधील विरोधी पक्षाची पूर्ण स्पेस भाजपाला मिळाली आहे. याचा भाजपाला भविष्यात भरपूर फायदा होणार आहे. त्यामुळे बंगालची निवडणूक भाजपा हरला तरी आता रातोरात भाजपाला उतरती कळा लागेल, असे म्हणणे थोडेसे घाईचे ठरेल. 

दुसरीकडे भाजपाने आसाममधील सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. येथे एनआरसीसारखे मुद्दे असतानाही भाजपाने २०१६ एवढ्याच जागा घेत विजय मिळवला. आसाममध्ये एआययूडीएफशी काँग्रेसने केलेली युती भाजपाच्या पथ्यावर पडली. तर दुसरीकडे दक्षिण भारतात केरळमध्ये भाजपाला करिश्मा दाखवता आला नसला तरी तामिळनाडूनमध्ये कमल हसन या प्रसिद्ध अभिनेत्याला भाजपाच्या उमेदवाराने पराभवाचा धक्का दिला. तर पाँडेचेरीमध्ये काँग्रेसचे आव्हान मोडून काढत एनडीए सत्तेवर आली आहे. त्याबरोबरच देशातील विविध राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांपैकी, कर्नाटक, महाराष्ट्र गुजरात, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांत भाजपाने विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपाचा बंगालमध्ये पराभव झाला असला तरी मोदी-शाहांचा करिश्मा ओसरला असे म्हणता. येणार नाही. मात्र पश्चिम बंगालच्या निकालांनी तगडा प्रतिस्पर्धी असेल तर मोदी-शाहांना रोखता येऊ शकते हे मात्र दाखवून दिले आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा