शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

दोनदा पुढे ढकलूनही सभा का होत नाही? भाजपच्या खासदाराचा अप्रत्यक्षपणे अमित शहांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 4:46 PM

West Bengal Assembly Election 2021: सुब्रमण्यम स्वामींचा ट्विटरवर सवाल; अमित शहांच्या ढकलण्यात आलेल्या सभेवरून निशाणा

नवी दिल्ली/कोलकाता: चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. यापैकी पश्चिम बंगालच्या सत्तासंघर्षाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा सामना पश्चिम बंगालमध्ये आहे. ममता बॅनर्जींकडून पश्चिम बंगाल खेचून घेण्यासाठी भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालमध्ये होते. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बंगाल दौऱ्यावर आहेत. शहा त्यांच्या दौऱ्यादरम्यान जनसभांना संबोधित करणार आहेत. पण बांकुरा जिल्ह्यातील त्यांची सभा दोनवेळा पुढे ढकलण्यात आली. सभेची वेळी दोनदा बदलली गेली. आता यावरून भाजपचेच खासदार सुब्रमण्यम स्वामींनी शहांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.अमित शाहंचा ममता बॅनर्जींवर पलटवार; म्हणाले, "हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, पण मी याला षडयंत्र..."'पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागातील अमित शहांच्या पूर्वनियोजित ऐतिहासिक जनसभेचं प्रक्षेपण पाहण्यासाठी टीव्ही लावला. पण सभा दोनदा पुढे ढकलण्यात आल्यानंतर वृत्तवाहिन्यांनी त्याबद्दल कोणतीही अपडेट दिली नाही. काही कारण कळेल का?,' असा सवाल स्वामींनी विचारला आहे. स्वामींच्या या प्रश्नावर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. गर्दी जमली नसेल, पेट्रोल महागल्यानं भाजप कार्यकर्त्यांना दुचाकी परवडत नसेल, अशी प्रतिक्रिया स्वामींच्या ट्विटखाली वाचायला मिळत आहेत.काय म्हणाले अमित शहा?सभास्थळी उशिरा दाखल झालेल्या अमित शहांनी उपस्थितांची माफी मागत ममता बॅनर्जींना टोला लगावला. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मला येण्यास उशीर झाला. परंतु मी याला षडयंत्र म्हणणार नाही, असा खोचक टोला शहांनी लगावला. गेल्याच आठवड्यात नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जींवर हल्ला झाला. त्यावरून बॅनर्जी भाजपवर बरसल्या होत्या. हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहाBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१