शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

"आता कुणाच्या कुबड्या नाही घेणार, २०२४ मध्ये स्वबळावर लढणार आणि... ” चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 10:25 IST

आगामी काळात भाजपा (BJP) पुन्हा एकदा शिवसेनेसोबत (Shiv sena) किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) आघाडी करून सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

पुणे - गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे राज्यातील सत्ताधारी असलेले महाविकास आघाडीचे सरकार कमालीचे अडचणीत आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी काळात भाजपा (BJP) पुन्हा एकदा शिवसेनेसोबत (Shiv sena) किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) आघाडी करून सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र आगामी काळातील आघाड्यांबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठे आणि सूचक विधान केले आहे. ("We will not take anyone's crutches now, we will fight own in 2024 and form Government" Chandrakant Patil's big claim)आज भाजपाचा ४१ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजपाच्या कार्यालयात ध्वजवंदन केले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पक्षाच्या आगामी काळातील वाटचालीबाबत मोठे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, राज्यामधील राजकीय वाटचालीबाबत आम्ही धोरण निश्चित केले आहे. आता आम्हाला राज्यात कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही यापुढे स्वबळावर निवडणुका लढवणार. २०२४ मध्ये दोन कोटी मतांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. तसेच आम्हाला कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही स्वबळावर निवडणून लढवून २०२४ मध्ये सरकार स्थापन करू, असा विश्वाय चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळातील तिसरा राजीनामा येईल, असे भाकित केले. त्यामुळे आता संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर आता कुणाला राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण