शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना साथ द्या; 900 हून अधिक कलाकार भाजपासाठी सरसावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 17:30 IST

देशाला मजबूर नव्हे, मजबूत सरकार हवं; कलाकारांची मोदी सरकारसाठी बॅटिंग

नवी दिल्ली: देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज असल्यानं त्यांना निवडून देण्याचं आवाहन देशातील 900 पेक्षा अधिक कलाकारांनी केलं आहे. यामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय, गायक शंकर महादेवन, गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह अनेक प्रख्यात कलाकारांचा समावेश आहे. या सर्व कलाकारांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत देशाला मजबूर नव्हे, तर मजबूत सरकार आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचं आवाहन या कलाकारांनी केलं आहे. 'पंतप्रधान म्हणून देशाला नरेंद्र मोदींची आवश्यकता आहे. ही काळाची गरज आहे. दहशतवादासारखी आव्हानं देशासमोर असताना 'मजबूर' नव्हे, तर 'मजबूत' सरकारची गरज आहे. त्यामुळेच आताचं सरकारच सत्तेत राहायला हवं,' असं 900 हून जास्त कलाकारांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे. यामध्ये त्रिलोकी नाथ मिश्रा, कोयना मित्रा, हंस राज हंस यांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये देशानं भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि विकासाभिमुख प्रशासन पाहिलं आहे, अशा शब्दांमध्ये कलाकारांनी त्यांच्या निवेदनात मोदी सरकारचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे आठवड्याभरापूर्वीच 600 हून अधिक कलाकारांनी भाजपा आणि मित्र पक्षांविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये अमोल पालेकर, नसिरीद्दुन शहा, गिरीश कर्नाड यांचा समावेश होतो. भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांना सत्तेतून खाली खेचण्याचं आवाहन या मंडळींनी केलं होतं. मोदी कायम सत्तेत राहिल्यास संविधानाला धोका असल्याची भीती या कलाकारांनी व्यक्त केली होती. गेल्या गुरुवारी 12 भाषांमध्ये हे संयुक्त निवेदन प्रसिद्ध आर्टिस्ट युनाईट इंडियाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं. आगामी लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं होतं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीbollywoodबॉलिवूडShankar Mahadevanशंकर महादेवन