धक्कादायक! आवडत्या पक्षाच्या विजयासाठी देवाला केला असा नवस, मनोकामना पूर्ण होताच मंदिरासमोर दिले आत्मबलिदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 09:19 PM2021-07-09T21:19:06+5:302021-07-09T21:31:51+5:30

Tamil nadu News: एका व्यक्तीने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डीएमके या राजकीय पक्षाच्या विजयासाठी देवाकडे नवस बोलला होता. दरम्यान, निवडणुकीत डीएमकेचा विजय झाल्यानंतर या व्यक्तीने मंदिरासमोर आत्महत्या करून देहत्याग केला.

The vow was made for the victory of DMK, self-sacrifice in front of the temple as soon as the wish was fulfilled | धक्कादायक! आवडत्या पक्षाच्या विजयासाठी देवाला केला असा नवस, मनोकामना पूर्ण होताच मंदिरासमोर दिले आत्मबलिदान

धक्कादायक! आवडत्या पक्षाच्या विजयासाठी देवाला केला असा नवस, मनोकामना पूर्ण होताच मंदिरासमोर दिले आत्मबलिदान

Next

चेन्नई - तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका व्यक्तीने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डीएमके या राजकीय पक्षाच्या विजयासाठी देवाकडे नवस बोलला होता. दरम्यान, निवडणुकीत डीएमकेचा विजय झाल्यानंतर या व्यक्तीने मंदिरासमोर आत्महत्या करून देहत्याग केला. (The vow was made for the victory of DMK, self-sacrifice in front of the temple as soon as the wish was fulfilled)

या व्यक्तीने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, त्याने डीएमकेच्या विजयासाठी देवाकडे प्रार्थना केली होती. तसेच हा नवस पूर्ण झाल्यास मंदिरासमोर आत्मबलिदान करेन, असे गाऱ्हाणे घातले होते. दरम्यान, हा नवस पूर्ण होताच त्याने मंदिरासमोर आत्मबलिदान दिले. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर तो सकाळी उठला. त्यानंतर देवदर्शनासाठी मंदिराच्या आवारात पोहोचला. तिथे त्याने त्याच्या शरीराला आग लावून घेतली आणि देहत्याग केला. मृत व्यक्ती निवृत्त सरकारी कर्मचारी होती. त्यांचं नाव उलगनाथन होते. ते ६० वर्षांचे होते.

दरम्यान, मंदिरामध्ये स्थानिकांना कथिरपणे एक पत्र मिळाले. त्यामध्ये लिहिले होते की, मृत व्यक्तीने राज्यात द्रमुकची सत्ता यावी, तसेच द्रमुक नेते सेंथिल बालाजी यांचा विजय व्हावा, यासाठी देवाला नवस बोलला होता. या व्यक्तीने देहत्याग करण्यासाठी आषाढ अमवास्येचा दिवस निवडला. तामिळ लोकांमध्ये हा दिवस शुभ मानला जातो. या व्यक्तीने मनोकामना पूर्ण झाल्याने आपले प्राण देवाला भेट दिले. दरम्यान, पोलिसांनी या व्यक्तीने लिहिलेले पत्र हस्तगत केले आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील लोकांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Web Title: The vow was made for the victory of DMK, self-sacrifice in front of the temple as soon as the wish was fulfilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.