शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

Vidhan Sabha Adhiveshan: संधी साधून रवी राणा यांनी राजदंड पळविला; भास्कर जाधव म्हणाले, बाहेर काढा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 12:22 IST

Vidhan Sabha Adhiveshan 12 Mla Suspension row: १२ आमदारांच्या निलंबनावरून विधानसभेत आणि विधानसभेबाहेर प्रचंड गदारोळ सुरु असून भाजपाच्या प्रति विधानसभेतील माईक काढून घेण्यात आला. बाहेर ही कारवाई सुरु असताना आमदार रवी राणा यांनी सभागृहात येत संधी साधून राजदंड पळविला.

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: १२ आमदारांच्या निलंबनावरून विधानसभेत आणि विधानसभेबाहेर प्रचंड गदारोळ सुरु असून भाजपाच्या प्रति विधानसभेतील माईक काढून घेण्यात आला. बाहेर ही कारवाई सुरु असताना आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी सभागृहात येत संधी साधून राजदंड पळविला. यावर भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश देत काही फरक पडत नसल्याचे सांगितले. (Ravi Rana snatched Rajdand, Bhaskar jadhav said let him go from Vidhan sabha monsoon session.)

Vidhan Sabha Adhiveshan: भाजपाच्या प्रतिविधानसभेतील माईक काढून घेतले; विधानसभा अध्यक्षांचे आदेश

रवी राणा यांनी राजदंड पळविताच मार्शल कुठे आहेत, त्यांना सभागृहाबाहेर काढा असे म्हणत राजदंड पळविला म्हणून सभागृहाचे कामकाज थांबणार नाही. रवी राणा शेतकऱ्यांबाबतची चर्चा सुरु आहे. तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल, तुमचे म्हणणे मांडायचे असेल तर तुम्ही थांबू शकता, असे सांगितले. अध्यक्षांच्या दालनात झालेली धक्काबुक्की, शिवीगाळवरून भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केले आहे. या विरोधात भाजपाने प्रतिविधानसभा भरविली आहे. तेथे स्पीकरवर भाषणबाजी केली जात आहे. गोपनिय कागद वाटले जात आहेत. माजी आमदार पुरोहीत देखील ते वाटत आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी विधानसभेत केली. यावर विधानसभा अध्यक्षांनी बाहेर वाटत असलेली कागदपत्रे, माईक जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

Vidhan Sabha Adhiveshan: भाजपाची विधान भवनाबाहेर भरली प्रतिविधानसभा; कालीदास कोळंबकर अध्यक्ष बनले अन्...

कोरोनामुळे आमदारांना फक्त पीएला घेऊन येण्याची परवानगी आहे. माजी आमदार कसे फिरू शकतात, असा सवाल त्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांना दिलेली कागदपत्रे त्यांचे आमदार वाटत आहेत. त्यांना विचारले असता ते अध्यक्षांची परवानगी घेऊनच वाटत असल्याचे सांगितले. परवानगी दाखव म्हटल्यावर ते दाखवू शकले नाहीत. ही कागदपत्रे, स्पीकर जप्त करण्याची मागणी करतानाच या कृत्यावर कारवाई करण्याची मागणी भास्कर जाधव यांनी केली होती. पृथ्वीराज चव्हाणांनी जोवर त्या प्रतिविधानसभेवर कारवाई होत नाही तोवर सभागृहाचे कामकाज थांबविण्याची मागणीक केली. तसेच अन्य एका आमदारांनी सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्याचेच निलंबन करण्याची मागणी केली आहे. यानंतर विरोधकांचा माईक काढून घेण्यात आला. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाRavi Ranaरवी राणाBJPभाजपाBhaskar Jadhavभास्कर जाधव