शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : युती तुटल्यास दोन्ही पक्ष आमनेसामने युद्धास सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 13:10 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : स्वतंत्र लढण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास पूर्वतयारी म्हणून मेळावे, उद्घाटनांचा सपाटा

ठळक मुद्देयुती होण्याबाबत २२ सप्टेंबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता २०१४ साली शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार असल्याचे भाजपकडून भासविण्यात आले.

- विकास राऊत 

औरंगाबाद : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होण्याबाबत २२ सप्टेंबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. समान जागा वाटपाचे गणित जुळेल, अशी शक्यता सध्या तरी दोन्ही पक्षांत नाही. शिवसेना ४० टक्के आणि भाजप ६० टक्के, असे जागावाटपाचे सूत्र सध्या चर्चेत आहे. त्यामुळे युतीचे जागा वाटपातून बिनसले तर दोन्ही पक्षांतील संभाव्य उमेदवारांना निवडणूक मैदानात होणाऱ्या युद्धाला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

भाजपकडे जिल्ह्यातील नऊ जागांवर उमेदवार तयार आहेत, तर शिवसेनेकडेदेखील जिल्ह्यातील सर्व जागांवर उमेदवार तयार आहेत. त्या तयारीतूनच उद्घाटन आणि भूमिपूजनाचा सपाटा प्रत्येक मतदारसंघात दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. २०१४ साली शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार असल्याचे भाजपकडून भासविण्यात आले. शिवसेनेचा मिशन १५० हा नारा त्यावेळी होता. भाजपला तो नारा मान्य नसल्यामुळे ऐनवेळी युती तुटली आणि दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. परिणामी, मराठवाड्यातील ४६ जागांपैकी भाजपला १५, तर शिवसेनेला ११ जागांवर यश आले. जिल्ह्यात भाजपला ३, शिवसेनेला तीन जागांवर यश मिळाले. एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. 

शिवसेनेने शहरातील पूर्व मतदारसंघातून राजू वैद्य, पश्चिममधून आ. संजय शिरसाट, मनोज गांगवे, मध्यमधून माजी आ. प्रदीप जैस्वाल, बंडू ओक, बाळासाहेब थोरात, राजेंद्र जंजाळ यांची मुलाखत घेतली आहे. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून जि.प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, संतोष माने, वैजापूरमधून माजी आर.एम. वाणी आणि रमेश बोरनारे यांच्यापैकी एक, कन्नडमधून उदयसिंह राजपूत, केतन काजे, तर सिल्लोडमधून माजी आ. अब्दुल सत्तार, फुलंब्रीतून बाबासाहेब डांगे, जिजा कोरडे आदी उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. 

भाजपनेदेखील इच्छुकांच्या मुलाखती घेऊन संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली आहे. पूर्व मतदारसंघातून राज्यमंत्री अतुल सावे, म्हाडा सभापती संजय केणेकर, मध्यमधून किशनचंद तनवाणी, केणेकर, अनिल मकरिये, पश्चिममधून राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड, पंकज भारसाखळे, फुलंब्रीतून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जि.प. सदस्या अनुराधा चव्हाण, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, प्रदीप पाटील, उपमहापौर विजय औताडे, वैजापूरमधून जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, डॉ. दिनेश परेदशी,  कन्नडमधून संजय खंबायते, किशोर पवार,  गंगापूरमधून आ. प्रशांत बंब, किशोर धनायत, सिल्लोडमधून सुरेश बनकर, सांडू लोखंडे पैठणमधून तुषार पा. शिसोदे, डॉ. सुनील शिंदे अशी इच्छुकांची फौज भाजपकडे आहे.

युती तुटली तर काय ? युती तुटल्यानंतर गंगापूर मतदारसंघात शिवसेनेकडून जि.प. अध्यक्षा डोणगावकर यांना मैदानात आणले तर विद्यमान आ. प्रशांत बंब यांच्यासमोरील अडचणी वाढतील. शिवाय भाजपमधूनही आ. बंब यांच्या विरोधात दिलीप बनकर यांनी शड्डू ठोकला आहे. ४पूर्वमध्ये राज्यमंत्री सावे यांना शिवसेनेचे वैद्य नाकीनाऊ आणतील. मध्यमध्ये माजी आ. जैस्वाल हे भाजपचे तनवाणी यांना त्रासदायक ठरतील. सिल्लोडमधून माजी आ. सत्तार यांच्या विजयाचे गणित भाजपच्या बनकर यांच्यामुळे बिघडेल, तर पश्चिममध्ये शिंदे किंवा गायकवाड हे आ. शिरसाट यांना जड जातील.पैठणमध्ये आ. संदीपान भुमरे यांना भाजपचे डॉ. शिंदे, शिसोदे हे रोखतील. फुलंब्रीत विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्यासमोर भाजपतून ऐनवेळी आयात होणाऱ्या सेना उमेदवाराचे आव्हान असेल. कन्नडमध्ये माजी आ. हर्षवर्धन जाधव आणि शिवसेनेचे राजपूत, भाजपचे खंबायते यांच्यात रस्सीखेच होऊ शकते. वैजापूरमध्ये भाजपने जाधव यांना उमेदवारी दिल्यास सेना भाजपमधूनच तगडा उमेदवार आयात करून आव्हान उभे करील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेना