Video: सेवेठायी तत्पर...! शर्ट काढला, झाड बाजुला केले; शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा असाही 'अवतार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 18:30 IST2021-05-31T18:24:20+5:302021-05-31T18:30:17+5:30
Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Video: “उपास-तापासाची वेळ नाही, रोज अंडे, मटन खा”; "३१ मे लक्षात ठेवा! तुम्ही सगळे महाराज एकत्र या; मग होऊन जाऊद्या आमने-सामने" अशा वक्तव्यांनी नेहमी वादात असलेले नेते संजय गायकवाड यांचे वेगळेच रुप पहायला मिळाले आहे.

Video: सेवेठायी तत्पर...! शर्ट काढला, झाड बाजुला केले; शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा असाही 'अवतार'
बुलढाणा: एकीकडे शिवसेनेच्या (Shiv Sena) एका आमदाराला पोलीस ठाण्यात तोडफोड केल्याप्रकरणी आजच शिक्षा झालेली असताना दुसरीकडे बुलढाण्याच्या आमदारांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी वादळामुळे रस्त्यात पडलेले झाड बाजुला करून रस्ता मोकळा करून दिला. (Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Clear road tree fall.)
Video: बाबो! चक्क मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो स्थानकावर 'भाऊगर्दी'; कोरोनावरून मनसेची टीका
संजय गायकवाड यांची जिल्ह्यात धडाडीचा नेता म्हणून ओळख आहे. आज त्यांचा हा बाहुबली अवताराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. “उपास-तापासाची वेळ नाही, रोज अंडे, मटन खा”; "३१ मे लक्षात ठेवा! तुम्ही सगळे महाराज एकत्र या; मग होऊन जाऊद्या आमने-सामने" अशा वक्तव्यांनी नेहमी वादात असलेले नेते संजय गायकवाड यांचे वेगळेच रुप पहायला मिळाले आहे. बुलढाणा मतदारसंघात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी आमदार जात होते. यावेळी रस्त्यावर एक झाड आ़डवे पडले होते. गायकवाड यांनी प्रशासनाची वाट न पाहता ते झाड त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बाजुला केले आणि वाहतुकीला रस्ता मोकळा करून दिला.
झाड हटवतानाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
Breaking : शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा आणि दंड
29 मे रोजीचा हा व्हिडीओ आहे. त्यांचा वाढदिवस होता. गुळभेली ते राहेरा मार्गाने ते नुकसानीच्या पाहणीसाठी जात होते. रस्ता बंद असल्याचे पाहून ते गाडीतून उतरले, शर्ट काढून जोर लगा के... म्हणत त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हे झाड बाजुला ढकलले. आमदार संजय गायकवाड यांचा झाड बाजूला करतानाचा व्हिडीओ त्यांनी स्वतः फेसबुकवर शेअर केला आहे.