शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भाजपावर मोठी नामुष्की, या राज्यातील मुख्यमंत्र्यांवर अवघ्या चार महिन्यात आली राजीनामा देण्याची वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 20:01 IST

Uttrakhand Political Crisis: भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी घटनात्मक अडचणींचे कारण देत तीरथ सिंह रावत यांना राजीनामा देण्याची सूचना दिली आहे.

देडराडून - विधानसभा निवडणूक वर्षावर आली असताना भाजपाने संभाव्य राजकीय नुकसान टाळण्यासाठी उत्तराखंडमध्ये नेतृत्वबदल केला होता. (Uttrakhand Political Crisis) तत्कालीन मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या जागी तीरथ सिंह रावत यांची नियुक्ती केली होती. मात्र आता अवघ्या चार महिन्यामध्येच तीरथ सिंह रावत यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. (Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat will resign)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी घटनात्मक अडचणींचे कारण देत तीरथ सिंह रावत यांना राजीनामा देण्याची सूचना दिली आहे. दरम्यान, उत्तराखंडच्या पुढील मुख्यमंत्र्याबाबत विधानसभा सदस्यांच्या पुढील बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या आमदारांमधूनच पुढील मुख्यमंत्र्याची निवड केली जाईल.

तीरथ सिंह रावत हे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. यादरम्यान, त्यांनी भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत दोन वेळा चर्चा केली आहे. पौडी येथून लोकसभा सदस्य असलेल्या रावत यांनी १० मार्च रोजी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, मुख्यंमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी तीरथ सिंह रावत यांना १० सप्टेंबरपर्यंत विधानसभा सदस्य म्हणून निवडून येणे आवश्यक आहे.

उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या दोन जागा गंगोत्री आणि हल्द्वानी रिक्त आहेत. तेथे पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. मात्र राज्यात पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणूक होणार असल्याने सदस्यत्वाचा एक वर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे. अशा परिस्थितीत कायदेतज्ज्ञांच्या मते निवडणूक घेणे हे निवडणूक आयोगाच्या म्हणण्यावर अवलंबून असेल.

त्यामुळेच तीरथ सिंह रावत यांना राजीनामा देण्याची सूचना देण्यात आली आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतर तीरथ सिंह रावत यांची मुख्यमंत्रिपदावर निवड करण्यात आली होती. त्रिवेंद्र सिंह रावत यांना काही आमदारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आले होते.  

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणIndiaभारतChief Ministerमुख्यमंत्री