शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या राजकारणाची प्रयोगशाळा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपची यंदा लिटमस टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 03:53 IST

यंदा साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे, उत्तर प्रदेशाकडे. उत्तर प्रदेशातील ८0 पैकी ७३ जागांवर २0१४ साली भाजप व मित्रपक्षांनी बाजी मारही होती.

- एन. के. सिंहलखनऊ : यंदा साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे, उत्तर प्रदेशाकडे. उत्तर प्रदेशातील ८0 पैकी ७३ जागांवर २0१४ साली भाजप व मित्रपक्षांनी बाजी मारही होती. या वेळी तसेच घडणार की समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष व राष्ट्रीय लोक दल यांची आघाडी भाजपला चितपट करेल, यावर केंद्रातील सत्तेची गणिते ठरणार आहेत.अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनानंतर ११ महिन्यांनी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या वेळी उत्तर प्रदेशसह देशभर हिंदुत्वाचे वातावरण होते. अशा स्थितीत सप व बसप यांनी एकत्र येऊन निवडणुका लढवल्या होत्या. त्या वेळी सप-बसप आघाडीला १७६ जागा (सपला ११0 व बसपला ६७) मिळाल्या होत्या. सरकार स्थापनेसाठी २१३ जागांची गरज होती. भाजपला १७६ जागा मिळाल्या होत्या. त्या वेळी सपला २१.८0 टक्के तर बसपला १९.६४ टक्के मते मिळाली होती. आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत दोघांच्या मतांमध्ये मिळून १२ टक्क्यांची वाढ दिसली होती. भाजपला मिळालेली मते ३२.५२ टक्के इतकी होती.त्याच सप-बसपची आता आघाडी आहे. त्यात रालोदही सहभागी आहे. त्यानंतर २0१४ च्या लोकसभा व २0१७ सालच्या विधानसभा निवडणुकांत या दोन पक्षांना मिळालेली मते पाहिली तर ती भाजपच्या आसपास वा त्याहून अधिकच आहेत. हे गणित लक्षात घेतले, तर यंदा उत्तर प्रदेशात भाजपला ५0 जागांचे नुकसान होऊ शकते. म्हणजेच २0१४ पेक्षा ५0 जागा कमी मिळू शकतात. हा फॉर्म्युला यशस्वी झाला, तर अन्य राज्यांतील प्रादेशिक पक्षही त्याची पुनरावृत्ती करू शकतील.भाजप सत्तेवर आल्यानंतर गाय, बैल, भारतमाता यांच्या नावाने अल्पसंख्याक, दलित व मागास जातींमध्ये भीतीची भावना निर्माण करण्यात आली. दलितांना लग्नाची वरात आपल्या घरासमोरून काढू नये, असे उच्च जातींच्या मंडळींनी बजावल्याचीही काही उदाहरणे आहेत.एके ठिकाणी घोडीवर दलित वर बसल्याने संतापून उच्च जातींतील एकाने त्याच्यावर बंदूकच रोखली होती. त्यामुळे या जाती भाजपवर नाराज आहेत. भाजप आपले आरक्षण पूर्णपणे रद्द करेल, अशीही भीती मागास जातींमध्ये आहे. त्यामुळे या जाती सप-बसपच्या मागे उभ्या दिसत आहेत. केवळ मतांची टक्केवारीच नव्हे, तर जे रसायन तयार झाले आहे, तेही भाजपच्या विरोधात दिसत आहे. आपल्याकडे फर्स्ट पास्ट द पोस्ट नावाचा एक खेळ आहे. त्यात खांबापाशी जो आधी पोहोचतो, तोच जिंकतो. निवडणुकीच्या खेळात मात्र दोन अधिक दोन म्हणजे चारच नव्हे, तर आठही होऊ शकतात.(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)>सपचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आपले वडील मुलायमसिंह व बसपच्या प्रमुख मायावती यांच्यातील २५ वर्षांपासूनचे वैर संपवून दाखवले आहे. त्यांच्यातील हा समझोता निवडणूक निकालांत त्यांना फायदा मिळवून देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.दोन प्रादेशिक पक्षांतील हा समझोताच मुळी देशातील राजकारणातील नवा व वेगळा प्रयोग आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी