शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बरं झालं आकाशात ढग नाहीत, कुत्र्याला रडार सिग्नल मिळतील; उर्मिलाचा मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 10:07 IST

एअर स्ट्राइकबद्दलच्या मोदींच्या विधानाची खिल्ली

नवी दिल्ली: बालाकोट एअर स्ट्राइकवर भाष्य करताना रडारवर केलेल्या विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी यावरुन मोदींवर निशाणा साधला. यानंतर आता उत्तर मुंबई मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीही मोदींना टोला लगावला. मातोंडकर यांनी ट्विट करत पंतप्रधानांवर शरसंधान साधलं. उर्मिला यांनी त्यांच्या कुत्र्यासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो डोंगरावर काढण्यात आला आहे. 'आकाश निरभ्र असल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. यामुळे माझा कुत्रा रोमियोच्या कानापर्यंत रडारचे सिग्नल अगदी स्पष्टपणे पोहोचतील,' असं उर्मिला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी या ट्विटसोबत एक फनी इमोजीदेखील जोडला आहे.पंतप्रधान मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बालाकोट एअर स्ट्राइकबद्दल केलेला दावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 'एअर स्ट्राइकच्या दिवशी हवामान चांगलं नव्हतं. आकाशात ढगाळ वातावरण होतं. एअर स्ट्राइकचा दिवस पुढे ढकलायला हवा, असं मत त्यावेळी काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं. त्यावेळी ढगाळ वातावरण आपल्यासाठी सहाय्यक ठरू शकतं, असं मी त्यांना सांगितलं. ढगांमुळे आपली लढाऊ विमानं शत्रूच्या रडारला दिसणार नाहीत, असं मी तज्ज्ञांना सांगितलं आणि आम्ही त्याच दिवशी एअर स्ट्राइक केला,' असा दावा मोदींनी मुलाखतीत केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीUrmila Matondkarउर्मिला मातोंडकरcongressकाँग्रेसIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक