शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
2
बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
3
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
4
आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात किती आहे नवे दर?
5
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
6
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
7
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
8
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
9
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
10
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
11
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
12
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
13
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
14
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
15
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
16
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
17
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
18
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
19
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
20
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी काय दिले उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 19:26 IST

Sharad Pawar Maha Vikas Aghadi CM Face : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असेल, याबद्दल बरीच चर्चा रंगली. उद्धव ठाकरे या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून म्हटले गेले. पण, याबद्दल शरद पवारांचे मत काय?

Sharad Pawar on Uddhav Thackeray : महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेआधी मुख्यमंत्रि‍पदाचा मुद्दा समोर आला. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेतले. विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे ही चर्चा शरद पवारांनी संपवली. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात का? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले. 

उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या कारकीर्दीकडे तुम्ही कसे पाहता आणि ते पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील असे वाटते का? असा प्रश्न शरद पवारांना एका मुलाखतीत विचारण्यात आला.  शरद पवार म्हणाले, "असे आहे की, कोण मुख्यमंत्री होईल, हा विषयच आता आमच्या पुढे नाही. पण, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाचे संकट होते. संबंध देशात, देशाच्या बाहेर संकंट होते. केंद्र सरकारने अनेक गोष्टींवर बंधने घातली. देशाच्या पंतप्रधानांनी थाळी वाजवा सांगून लोकांना घराच्या बाहेर पडायचे नाही सूचना दिल्या होत्या." 

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या काळातील कामाचे कौतुक

"कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे, बाकीचे मुद्दे सोडावे अशी भूमिका केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधानांनी स्वतः मांडली होती. त्याला सहकार्य करण्याची आवश्यकता होती. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, यासंबंधी पूर्ण सहकार्य करण्याचे काम पूर्ण ताकदीने केले. त्यांनी हे बघितले नाही की, नरेंद्र मोदींनी अशा अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यांचा पक्ष वेगळा आहे. इथे पक्ष वगैरे काही नाही. इथे कोरोनाचे संकट, त्यातून लोकांना वाचवायचे कसे?", असे शरद पवार उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या काळातील कामाबद्दल म्हणाले. 

"अनेक ठिकाणी लोकांना मृत्युला सामोरे जावे लागले, ती स्थिती महाराष्ट्रात होणार नाही; यासंबंध राज्याची यंत्रणा या कामाला कशी लावता येईल. या प्रकारची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आणि माझ्या मते, त्या संकंटाच्या काळात त्यांनी जे धैर्य आणि जे प्रशासन दाखवले, त्याचे स्वागतच केले पाहिजे", असे कौतुक शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या कामाचे केले.     

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्री