शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 10:10 IST

Ramdas Kadam Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करत नवा राजकीय बॉम्ब फोडला. संजय शिरसाट यांनी केलेल्या खळबजनक दाव्यावर बोलताना त्यांनी हे विधान केले. 

Ramdas Kadam Uddhav Thackeray News : टआनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झालो होता. हे ठाणे जिल्ह्याला माहिती आहे', असा खळबळजनक दावा शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला होता. त्यावर बोलताना रामदास कदम यांनी आणखी एक गौप्यस्फोट करत उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आनंद दिघेंचा अपघात होण्याच्या काही दिवस आधी ठाकरेंनी दिघेंचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता, असा दावा रामदास कदमांनी केला आहे. 

माध्यमांशी बोलताना रामदास कदम म्हणाले, "संजय शिरसाटांना काय माहिती आहे, याची मला कल्पना नाही. पण आनंद दिघे आणि मी, आम्ही जवळचे मित्र होतो. १९९५ मध्ये शिवसेनेचे सरकार आले होते. त्यावेळी आनंद दिघे हे ठाण्याच्या विकास कामांची यादी माझ्याकडे द्यायचे. मी ते मंजूर करून आणायचो. माझ्या हस्ते ते भूमिपूजन करायचे." 

एकनाथ शिंदे चांगलं काम करताहेत -कदम

"मला वाटतं की याबाबतीत आता अधिक चर्चा करण्यापेक्षा, आनंद दिघे हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावेत याबाबतीत चित्रपटाच्या माध्यमातून जो कार्यक्रम एकनाथ शिंदेंनी घेतला आहे. तो अतिशय स्तुत्य असा आहे. आनंद दिघेंबद्दल नव्या पिढीला कल्पना नव्हती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम एकनाथ शिंदे करताहेत. चांगलं काम करताहेत", अशी भूमिका त्यांनी धर्मवीर चित्रपटाबद्दल बोलताना मांडली.  

उद्धव ठाकरेंनी मागितला आनंद दिघेंचा होता राजीनामा -रामदास कदम "त्यांचा खून कुणी केला, काय केला, कसा केला? त्यांचा मृत्यू कसा झाला, ही निवडणुकीच्या तोंडावरची वेळ नाहीये. ही वेळ नाहीये. मात्र, एवढं मला माहिती आहे की, आनंद दिघेंचा ठाणे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता, हे मला माहिती आहे. त्याच काळामध्ये म्हणजे ज्यावेळी हा अपघात घडला, ते हॉस्पिटलमध्ये भरती होते; त्याच आठ दहा दिवसांच्या दरम्यान", असा स्फोटक दावा कदम यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेत केला. 

याबद्दल पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले, "कारण स्वतः आनंद दिघे मला बोलले होते. माझी आणि आनंद दिघेंची याविषयावर चर्चा झाली होती. म्हणून एक गोष्ट नक्की आहे की, आनंद दिघेंचं खच्चीकरण करण्याचे काम उद्धव ठाकरेंकडून त्यावेळी होत होतं, हे शंभर टक्के सत्य आहे", असेही ते म्हणाले. 

संजय शिरसाट आनंद दिघेंबद्दल काय म्हणालेले?

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संजय शिरसाट म्हणाले होते की, "आनंद दिघेंना मारले होते, त्यांचा अपघात झाला होता. हे ठाणे जिल्ह्याला माहिती आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये दिघे उपचार घेत होते, ते कायमचे बंद का करण्यात आले? दिघे यांना डिस्चार्ज दिला जाणार होता, मग डिस्चार्ज द्यायच्या आधीच त्यांचा मृत्यू कसा झाला? आमच्या मनात अनेक वर्षांपासून शंका आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी", अशी मागणी शिरसाट यांनी केली होती. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे