शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

नव्या शोधाबद्दल उद्धव ठाकरेंना नोबेल द्या; काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 5:25 AM

उद्धव ठाकरेंच्या विधानावर काँग्रेसची टोलेबाजी

मुंबई : धारावीतल्या लोकांना चावणारा डास मातोश्रीवर येऊन मलाही चावतो, त्यामुळे धारावीकरांशी माझे रक्ताचे नाते आहे, असे विधान धारावीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यावर काँग्रेसने शिवसेनेवर शालजोडीतून टीकास्त्र सोडले.या आधी मुंबईमधील वाढत्या डासांचा उपद्रव पाहता, आम्ही अल्पज्ञ वृथा मुंबई महापालिकेच्या कारभाराला दोष देत होतो, परंतु मुंबईकरांमध्ये भाऊबंदकी वाढावी, सद्भावना निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने डासांची पैदावार वाढविण्यासाठी शिवसेना कार्यरत होती, हे आम्हाला आत्ता समजले. त्यामुळे उद्धव ठाकरेंमधील विचारवंत, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व आम्ही इतकी वर्ष ओळखू शकलो नाही, याबद्दल आम्हाला आता वैषम्य वाटत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

'डासभाऊ’ हा शोध लावणाऱ्या ठाकरे यांची महानता जगाने ओळखली पाहिजे. याकरिता शांती व विज्ञान या दोन्ही क्षेत्रांतील कामगिरीसंदर्भात विश्वडासबंधुत्व वाढविण्यासाठी नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. डासांचा नायनाट करण्यासाठी या अगोदर अगरबत्तीसह विविध उत्पादने वापरून डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांना पायबंद कसा घालता येईल, याकडे जनतेचा प्रयत्न असायचा, परंतु डासांचा एवढा महान उपयोग असू शकतो, हे कळल्यानंतर प्रेम, बंधुभाव आणि सद्भावनासारख्या महान उद्देशांसाठी आता या उत्पादनांवर बंदी घालायलाच हवी, परंतु नोबेल पुरस्कारासाठी अडथळा निश्चित आहे. एकच डास दोन व्यक्तींना चावल्याने त्यांच्यात बंधुभावाचे नाते तयार होते, असे उद्धवजींनी आपल्याला सांगितले आहे. हा वैश्विक विचार आहे, असा टोला ही त्यांनी लगावला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना