शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

'उद्धव ठाकरे सुसंस्कृत नेते, पण धुक्यात त्यांनी भलताच हात धरला...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 13:39 IST

Lokmat interview with Sudhir Mungantiwar: अजित पवारांचा वक्तशिरपणा आणि स्पष्टवक्तेपणा सर्वात चांगला...

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय सुसंस्कृत आणि पारिवारीक व्यक्ती आहेत. त्यांना आपल्या लोकांची काळजी असते, पण काही कारणास्तव त्यांनी धुक्यामध्ये दुसऱ्या कुणाचातरी हात पकडला, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत  मुनगंटीवारांना काही नेत्यांना एक गाणं डेडीकेट करणे आणि त्यांचा एक चांगला गुण सांगून त्यांना सल्ला द्यायला सांगितला. त्यावर मुनगंटीवार यांनी भन्नाट उत्तरे दिली.

पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसमध्ये एकटेलोकमतचे वरिष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी मुनगंटीवारांना सर्वात आधी पृथ्वीराज चव्हाणांबद्दल विचारले. त्यावर मुनगंटीवार म्हणाले की, ' पृथ्वीराज चव्हाण अतिशय प्रामाणीक आणि सयंमी नेते आहेत. तसेच, यावेळी मुनगंटीवारांनी चव्हाणांसाठी 'आदमी मुसाफीर है, आता है जाता है...झोका हवा का पानी का घेरा...फिर वो अकेला रेह जाता है...', हे गाणं म्हणत पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसमध्ये एकटे पडल्याची भावना बोलून दाखवली. 

जेव्हा सुधीर मुनगंटीवारांनी अमिताभ बच्चन यांना ऐकवला होता त्यांच्या चित्रपटातील डायलॉग

अजित पवार वक्तशिर नेते, पण...पुढे मुनगंटीवारांना अजित पवारांविषयी विचारण्यात आले असता, ते म्हणाले की अजित पवारांचा वक्तशिरपणा आणि स्पष्टवक्तेपणा सर्वात चांगला आहे. इतर नेत्यांना हेवा वाटेल असा त्यांचा हा गुण आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच अजित पवारांमध्ये मीपणाची ऐट असल्याचे म्हणत, 'आज जवानी(राजनिती)पर इतराने वाले कल तु पचतायेगा...चढता सूरज धिरे धिरे ढलता है, ढल जायेगा,'हे गाणं गायलं. 

उद्धव ठाकरेंनी धुक्यात भलताच हात पकडला... पुढे मुनगंटीवारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, उद्धव ठाकरे एक सुसंस्कृत आणि पारिवारीक राजकारणी आहेत. पण, त्यांनी अचानक आमची साथ सोडली आणि धुक्यात भलत्याच व्यक्तीचा हात पकडला. आता त्यांना तो हात सोडताही येत नाही, असे म्हटले. तसेच, 'भला किसी का कर ना सके तो, बुरा किसी का मत करना...पुष्प नही बन सकते तुम काटे मत बनना...'हे गाण डेडीकेट केलं.

'त्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनाच अर्थमंत्री व्हायचं होतं, पण...'

फडणवीस आक्रमक आणि अभ्यासू नेतेयावेळी सर्वात शेवटी मुनगंटीवारांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचे आपले मत व्यक्त केले. फडणवीस हे अतिशय आक्रमक आणि अभ्यासू नेते असल्याचं ते म्हणाले. तसेच, 'रूक जाना नही, तू कभी हार के, काटो पे चलके मिलेंगे साये बहार के...', हे गाणं डेडीकेट केलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस