शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांनी पाडले तृणमूल काँग्रेसला खिंडार; आजी माजी खासदारांसोबत ११ आमदार भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 16:06 IST

west Bengal Politics: गेल्या वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेत आमदारकीचाही राजीनामा दिल्याने ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

कोलकाता : जेव्हा प. बंगालमध्ये विधानसभेचे निकाल लागतील तेव्हा भाजपा २०० च्या बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. आज ममता बॅनर्जी यांच्या सरकारला जोरदार धक्के देण्यात आले आहेत. आजी माजी खासदारांसह ११ आमदारांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत शहांच्या उपस्थितीच भाजपात प्रवेश केला आहे. 

गेल्या वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेत आमदारकीचाही राजीनामा दिल्याने ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर त्यांनी ममता सरकारमध्ये नाराज असलेल्या आमदार, खासदारांना फोडण्याचे प्रयत्न केला होता. आज या नाराजांनी अधिकारी यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला. यामध्ये तापसी मोंडल, अशोक दिंडा, सुदीप मुखर्जी, सायकत पंजा, शिलभद्र दत्ता, दिपाली बिश्वास,  सुक्र मुंडा, श्यामपदा मुखर्जी,  विश्वजीत कुंडू आणि बन्सारी मैती यांचा समावेश आहे. 

यावेळी अधिकारी यांनी ममता यांच्या सरकारवर टीका केली. प. बंगालची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली आहे. जर राज्याला वाचवायचे असेल तर त्याची कडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. यानंतर अमित शहा यांनी ममता यांच्यावर टीका केली. ममता सांगतात की भाजपा सर्व पक्षांतून नेत्यांची आयात करते. मात्र, त्यांना लक्षात आणून देवू इच्छितो की त्यांचा मूळ पक्ष हा काँग्रेसचा होता. ही तर साधी लाट आहे. मी ज्या प्रकारची त्सुनामी पाहतोय, याची ममता यांनी कल्पनाही केली नसेल. ममता आता एकट्याच राहतील. जे लोक भाजपात येत आहेत ते लोक माँ-माटी-मानुषच्या नाऱ्यासोबत पुढे आले होते. आज त्या लोकांचा मोहभंग झाला आहे. 

मोदींनी गरीबांसाठी जे अन्नधान्य पाठविलेले ते तृणमूल काँग्रेसने फस्त केले. भाजपाध्यक्षांच्या ताफ्यावर मोठमोठे दगड फेकले गेले, आम्ही यामुळे घाबरणारे नाही. प. बंगालच्या लोकांनी आता सत्तांतराचे मन बनविले आहे, असेही शहा म्हणाले. 

अधिकाऱ्यांचे जाणे परवडणार नाहीआपल्या संघटनात्मक कौशल्यामुळे शुभेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व म्हणून समोर आले होते. दोन वेळा खासदार राहिलेले शुभेंदू हे नंदिग्राममधील आंदोलनामुळे चर्चेत आले होते. या आंदोलनाने बंगालच्या राजकारणाची दिशा बदलली होती. यामुळे त्यांचे पक्ष सोडून जाणे ममता बॅनर्जींना परवडणारे नाहीय. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालAmit Shahअमित शहाBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिका