शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

“शिवसेनेचे सगळेच ‘संजय’ बेशिस्त आहेत यात कसलीही शंका नाही; आधी राऊत, मग राठोड अन् आता...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 10:57 IST

भाजपा आमदार संजय कुटे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

ठळक मुद्देसंजय गायकवाड किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करू शकतात याचे प्रमाण त्यांनी दिले आहे. जोपर्यंत संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत भाजपाच्यावतीनं जिल्हाभर आंदोलन करणार आहे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात भाजपा नेते एकवटले

मुंबई – शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर शिवसेना-भाजपा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे सगळेच ‘संजय’ बेशिस्त आहेत, यात आता कसलीही शंका उरली नाही. आधी राऊत, नंतर राठोड आणि आता संजय गायकवाड अशा शब्दात भाजपा आमदार संजय कुटे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.

आमदार संजय कुटे यांनी संजय गायकवाड यांचा पुतळा जाळून निषेध केला. संजय गायकवाड किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करू शकतात याचे प्रमाण त्यांनी दिले आहे. जोपर्यंत संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत भाजपाच्यावतीनं जिल्हाभर आंदोलन करणार आहे असा इशारा आमदार संजय कुटे यांनी दिला आहे.

आमदार संजय गायकवाडांची धमकी

संजय कुटेसारखे आमदार दारू पिऊन वावरात पडलेले असतात. त्याला सर्व शौक आहे तो मवाली आहे. तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर ५० मीटर माझ्या जवळ येऊन दाखव तुला संजय गायकवाड काय आहे ते दाखवतो अशी धमकी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भाजपा आमदार संजय कुटे यांना दिली आहे. माझ्याविरोधात तक्रार काय देता? मीच तुमच्याविरोधात तक्रार करतो. राज्यातील लोक मरू लागले आणि तुम्ही आंदोलन करताय. लोक मरत आहेत त्याला जबाबदार तुम्ही आहात असा आरोपही संजय गायकवाड यांनी केला आहे.

“तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर...”; शिवसेना आमदार संजय गायकवाडांची भाजपा आमदाराला धमकी

...अन्यथा जनता पातळी दाखवेल.

मविआ सरकारचे मुख्यमंत्री केवळ टिव्हीवर आणि त्यांचे नेते माध्यमांवर भाषणबाजी करण्यातच धन्यता मानतात. जनतेचं काम करायचं आहे तर रस्त्यावर उतरून जनसेवा करून दाखवा. खालच्या पातळीचं राजकारण करणं सोडा, अन्यथा जनताच तुम्हाला तुमची पातळी दाखवेल असा टोला भाजपानं ट्विटरवरून दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांवर केली होती टीका

'तुमच्या सरकारमुळे लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याचा घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो, त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते असं विधान संजय गायकवाड यांनी केले होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा