शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

राज्यात मोगलाई आहे काय? शिवजयंतीवर निर्बंधांवरून देवेंद्र फडणवीस यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 13:06 IST

Devendra Fadnavis Criticize Maharashtra Government over restrictions on Shiv Jayanti : छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करायला आम्हाला कोणी रोखू शकत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत,  तोपर्यंत शिवजयंती साजरी होत राहील

नागपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून राज्यातील अनेक सण, उत्सव हे साधेपणाने साजरे केले जात आहेत. दरम्यान, आज साजऱ्या होत असलेला शिवजयंती (Shiv Jayanti) सोहळाही अनेक निर्बंधांसह साजरा होत आहे. दरम्यान, शिवजयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 :) सोहळ्यावर निर्बंध आणल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची (Maharashtra Government) विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मोगलाईशी तुलना केली आहे. (Devendra Fadnavis Criticize Maharashtra Government over restrictions on Shiv Jayanti )

शिवजयंती व विज बिल संदर्भात राज्य सरकारने जी भूमिका घेतली त्यामुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची तुलना मोगलाई शी केली. आज ते नागपूर येथे शिवजयंती उत्सवात सहभागी झाले तेव्हा बोलत होते. राज्यात राजकीय पक्षाचे मोठमोठे कार्यक्रम होतात त्यावर सरकार बंदी आणत नाही मात्र राज्य सरकारकडून शिवजयंती साजरी करतांना कलम १४४ लावले जाते.  छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करायला आम्हाला कोणी रोखू शकत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत,  तोपर्यंत शिवजयंती साजरी होत राहील, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 राज्य सरकार विदर्भ व  मराठवाड्याचा विकास निधी पळवत आहे.. विदर्भ वैधनानिक विकास मंडळ बंद करून यांनी निधी पळवण्याचा मार्ग मोकळा केला आहे.वैधनानिक विकास मंडळ बंद करून यांनी विदर्भ व मराठवाडा मधील जनतेचा विश्वासघात केला आहे, असा घणाघाती आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणात एक अहवाल न्यायालयात आहे त्यावर अजून निर्णय यायचा आहे... आता यावर बोलणे योग्य होणार न्यायालयाचा निर्णय आल्यावर भूमिका मांडू, असे त्यांनी सांगितले.  वीज बिलावर काँग्रेस सत्तेत राहून विरोधी पक्षाची मजा घेण्याचा प्रयत्न करत आहे.. मंत्री काँग्रेसचा आहे मग ठाम भूमिका घ्यायला पाहिजे. जनता मूर्ख नाही त्यांना सर्व समजते, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

 ज्यांनी संविधान वाचले नाही, ज्यांनी महाराष्ट्र विधान सभेचे नियम वाचले नाही तेच अध्यक्ष निवडीवरून राज्यपालांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करू शकता. संविधानात सांगितले आहे अध्यक्ष निवडीची तारीख राज्यपालने ठरवून गुप्त मतदान पद्धतीने ती निवडणूक करावी त्यामुळे माझा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सवाल आहे की त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मान्य आहे की नाही. महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक टॅक्स कमी करत नाही, केंद्र सरकारने कृषिचा सेज पेट्रोल डिझेल वर लावून ३ रुपये टॅक्स कमी केला, तसे राज्य सरकार करत नाही त्यामुळे राज्यातील जनतेला अधिक पेट्रोल डिझेल साठी अधिक पैसे मोजावे असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस